Home नंदुरबार जिल्हा जिल्हास्तरीय लोकशाही दिन – नागरिकांच्या समस्यांवर तत्पर प्रतिसादाचा उपक्रम!

जिल्हास्तरीय लोकशाही दिन – नागरिकांच्या समस्यांवर तत्पर प्रतिसादाचा उपक्रम!

2
District Level Democracy Day – An initiative to respond promptly to citizens' problems!

(नंदुरबार) लोकशाही ही जनतेच्या सहभागातूनच बळकट होते, आणि नागरिकांच्या अडचणींचे समाधान प्रशासनाने वेळेत व कार्यक्षमतेने केल्यास शासनावरचा विश्वास दृढ होतो. या उद्देशाने दर महिन्याला आयोजित करण्यात येणाऱ्या जिल्हास्तरीय लोकशाही दिनातर्फे दिनांक 03 नोव्हेंबर 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात नागरिकांच्या विविध तक्रारी व मागण्यांवर सुनावणी घेण्यात आली.

अर्ज संख्येचा आढावा:

या लोकशाही दिनाच्या दिवशी एकूण 12 अर्ज प्राप्त झाले, तर 14 अर्ज प्रलंबित होते. तर, दि. 06 जानेवारी 2025 ते 06 ऑक्टोबर 2025 या कालावधीत जिल्हा प्रशासनाकडे एकूण 78 अर्ज प्राप्त झाले आहेत.

प्रत्येक अर्जाचा सखोल आढावा घेऊन संबंधित विभाग प्रमुखांना तात्काळ कार्यवाहीचे निर्देश देण्यात आले. विशेषत: महसूल व पोलिस विभागाशी संबंधित तक्रारींवर तातडीने निराकरण व्हावे, यासाठी जिल्हा प्रशासनाने प्राधान्य दिले आहे.

लोकशाही दिन हा केवळ तक्रार निवारणाचा कार्यक्रम नसून, नागरिक व प्रशासन यांच्यातील संवादाचे व्यासपीठ आहे. नागरिकांनी आपल्या समस्यांचे मोकळेपणाने मांडणी केली, तर अधिकाऱ्यांनी सविस्तर स्पष्टीकरण देत समाधानकारक उत्तर दिली.

या उपक्रमाद्वारे नागरिकांच्या मागण्यांचे वेळेत निवारण, पारदर्शकता आणि जबाबदारी यावर भर देण्यात येत आहे. लोकशाही दिनाच्या माध्यमातून प्रशासन ‘जनतेच्या दारी प्रशासन’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणत आहे.

#लोकशाहीदिन#नंदुरबार#जिल्हाधिकारीनंदुरबार#जनतेच्यादारीप्रशासन#GoodGovernance#eSushasan#CollectorOfficeNandurbar