Home महाराष्ट्र बिडी कामगारांच्या किमान वेतनवाढीबाबत उद्योजकांनी सकारात्मक भूमिका घ्यावी – मंत्री ॲड. आकाश...

बिडी कामगारांच्या किमान वेतनवाढीबाबत उद्योजकांनी सकारात्मक भूमिका घ्यावी – मंत्री ॲड. आकाश फुंडकर  

2
Entrepreneurs should take a positive stand regarding the increase in minimum wage of bidi workers – Minister Adv. Akash Fundkar

मुंबई: बिडी कामगारांच्या उपजीविकेचा प्रश्न गांभीर्याने घेतला पाहिजे. कामगारांचा उदरनिर्वाह या उद्योगावर अवलंबून असल्याने त्यांना योग्य न्याय मिळावा, तसेच त्यांच्या किमान वेतनात वाढ करण्याबाबत या क्षेत्राशी संबंधित उद्योजकांनी सकारात्मक भूमिका घ्यावी, असे आवाहन कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर यांनी केले

बिडी कामगारांच्या किमान वेतन व महागाई भत्त्याच्या प्रश्नासंदर्भात कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली बीकेसी  येथील कामगार भवनात बैठक आयोजित करण्यात आली होती.

बैठकीस कामगार विभागाचे उपसचिव दिपक पोकळे, तसेच संबंधित अधिकारी, मालक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी कामगार संघटनांच्या प्रतिनिधींनी बिडी कामगारांना किमान वेतनासोबत महागाई भत्ता देण्यात यावा, अशी मागणी केली.

मालक प्रतिनिधींनी या संदर्भातील आपले सविस्तर निवेदन शासनाकडे सादर करावे, असे सांगत कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर म्हणाले, प्राप्त निवेदनाचा विचार करून शासनस्तरावर पुढील निर्णय घेण्यात येईल. बिडी कामगारांच्या किमान वेतनाबाबत सर्व संबंधित घटकांच्या भूमिका विचारात घेऊन न्याय्य व समतोल निर्णय घेण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. असेही ते म्हणाले.