महाराष्ट्र ॲग्रीबिझनेस नेटवर्क प्रकल्पाच्या आढावा बैठकीत सांगितले. सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत प्रकल्पाची सद्यस्थिती, आतापर्यंतची प्रगती तसेच प्रस्तावित मॅग्नेट २.० प्रकल्पाच्या अंमलबजावणीसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.
प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यातील शेतकरी उत्पादक कंपन्या, कृषी मूल्यसाखळी आणि काढणीनंतरच्या पायाभूत सुविधांना अधिक बळकटी देण्याच्या दृष्टीने कामाला गती द्यावी. राज्यातील कृषी उत्पादनांना देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा वेळेत उभारण्यात याव्यात, अशा सूचना पणन मंत्री रावल यांनी यावेळी दिल्या.
बैठकीस आशियाई विकास बँकेचे संचालक ताकेशी उएडा, वरिष्ठ जलसंपदा तज्ज्ञ अलेक्सिया मिशेल्स, कृषी व नैसर्गिक संसाधन विशेषज्ञ क्रिशन सिंग रौतेला, मॅग्नेट प्रकल्प संचालक विनायक कोकरे, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे अधिकारी तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
















