Home नंदुरबार जिल्हा शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीमध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीमध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

0
Guru Purnima Celebrated with Enthusiasm at Shatabdi Institute of Pharmacy

नंदुरबार(प्रतिनिधी):-शकुंतला पाटील बहुउद्देशीय संस्थेच्या शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, बामदोड येथे गुरुपौर्णिमेचा पवित्र उत्सव उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात गुरु पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यानंतर प्राचार्य, शिक्षक व विद्यार्थ्यांनी गुरुजनांना पुष्प अर्पण करून कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी प्राचार्य डॉ. पंकज एम. चौधरी यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “गुरु हा विद्यार्थ्यांच्या जीवनाला योग्य दिशा देणारा, ज्ञानाचा दीप प्रज्वलित करणारा आणि व्यक्तिमत्त्व घडविणारा खरा मार्गदर्शक असतो. गुरूंच्या मार्गदर्शनामुळेच विद्यार्थ्यांमध्ये ज्ञान, संस्कार, शिस्त आणि आत्मविश्वासाची जडणघडण होते. प्रत्येक विद्यार्थ्याने गुरुजनांप्रती आदर, कृतज्ञता आणि समर्पणाची भावना कायम ठेवावी, हाच गुरुपौर्णिमेचा खरा संदेश आहे.”
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमेचे महत्त्व सांगणारी मनोगते व्यक्त केली. तसेच गुरु- शिष्य परंपरेचे महत्त्व अधोरेखित करत शिक्षकांविषयी आदर व कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्यात आली. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती योगिता गणेश पाटील व सचिव गणेश गोविंद पाटील यांनी प्राचार्य, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे मनः पूर्वक कौतुक केले. या कार्यक्रमास प्राचार्य, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.