Home आरोग्य महिला दिनानिमित्त नंदुरबारमध्ये महाआरोग्य शिबिर; तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी व एड्स जनजागृती

महिला दिनानिमित्त नंदुरबारमध्ये महाआरोग्य शिबिर; तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी व एड्स जनजागृती

0
Health camp in Nandurbar on Women's Day; Check-ups and AIDS awareness by expert doctors

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने नंदुरबार येथे नगरपालिका महिला व बाल विकास विभाग, जिल्हा रुग्णालय नंदुरबार आणि संपूर्ण सुरक्षा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले. महिलांच्या आरोग्याबाबत जनजागृती करणे तसेच विविध आजारांचे वेळेवर निदान व्हावे या उद्देशाने हे शिबिर घेण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात एसएसके मॅनेजर गोपाल गाडीलोहार यांच्या प्रास्ताविकाने झाली. यावेळी जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी विश्वास सूर्यवंशी यांनी महिलांना निरोगी जीवनासाठी नियमित योगा, व्यायाम आणि संतुलित आहाराचे महत्त्व पटवून दिले.

यानंतर जिल्हा रुग्णालयाचे समुपदेशक सुभाष निकम व तेजल माळी यांनी महिलांना आरोग्याची काळजी कशी घ्यावी, नियमित तपासणीचे महत्त्व काय आहे आणि महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये याबाबत मार्गदर्शन करत महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच नवनिर्माण संस्थेचे अध्यक्ष रवी गोसावी यांनी महिलांनी आज विविध क्षेत्रात मोठी प्रगती केली असून स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले.

तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी:

महाआरोग्य शिबिरात महिलांची सविस्तर आरोग्य तपासणी करण्यात आली. शिबिरात HIV, सिफिलिस, हिपॅटायटिस, रक्तदाब (BP), साखर (Sugar) तसेच इतर आजारांच्या रक्त तपासण्या करण्यात आल्या. तसेच नेत्ररोग, त्वचारोग, दंतरोग, स्त्रीरोग, ENT आदी विभागांतील तपासण्या मोफत करण्यात आल्या.

या शिबिरात खालील तज्ञ डॉक्टरांनी महिलांची तपासणी करून आवश्यक ते मार्गदर्शन केले –

डॉ. कपिल दुसेजा – नाक, कान, घसा तज्ञ

डॉ. अन्सारी रिजवान – फिजिशियन

डॉ. श्वेता जिंदे – स्त्रीरोग तज्ञ

डॉ. दीपक वसावे – नेत्ररोग तज्ञ

डॉ. प्रिती वळवी – त्वचा व गुप्तरोग तज्ञ

डॉ. दिनेश वळवी – मानसोपचार तज्ञ

डॉ. कैलाश चव्हाण – दंतरोग तज्ञ

डॉ. कृष्णकुमार वळवी – बालरोग तज्ञ

या शिबिराला नवनिर्माण संस्था, विहान संस्था आणि जिल्हा क्षयरोग केंद्र नंदुरबार येथील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमावेळी नगरपालिका अध्यक्षा सौ. रत्नाताई रघुवंशी, महिला व बालविकास सभापती, शिक्षण सभापती तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. महिला दिनानिमित्त आरोग्य विभागातील महिला डॉक्टर व महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

या महाआरोग्य शिबिराला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून मोठ्या संख्येने महिलांनी तपासणी करून घेतली.

@mahahealthiec Maha Arogya IEC Bureau