(नंदुरबार) जिल्ह्यातील तळोदा येथे कार्यरत असलेल्या Feeding India या संस्थेच्या Plug-In Kitchen प्रकल्पाला आज मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी भेट देऊन स्वयंपाकघराची पाहणी केली तसेच सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती घेतली.
या स्वयंपाकघरातून सध्या तळोदा तालुक्यातील एकूण 115 अंगणवाडी केंद्रांमधील 3 ते 6 वर्षे वयोगटातील सुमारे 4,000 नोंदणीकृत बालकांना दररोज पौष्टिक, विविध प्रकारचा, गरम शिजवलेला नाश्ता, दुपारचे जेवण आणि फळे पुरवली जात आहेत. पुढील महिन्याच्या अखेरीपर्यंत या सेवेचा विस्तार एकूण 246 अंगणवाड्यांपर्यंत करण्यात येणार आहे.
मा. जिल्हाधिकारी यांनी या उपक्रमाचे निरीक्षण करताना संपूर्ण टीमच्या सततच्या प्रयत्नांचे, गुणवत्तेचे आणि बांधिलकीचे विशेष कौतुक केले आणि जिल्ह्यातील बालकांच्या पोषणस्थिती सुधारण्यासाठी हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा असल्याचे नमूद केले.
या प्रसंगी तहसीलदार श्री. दीपक धिवरे, CDPO श्री. सागर वाघ, गवितजी, वर्तनी अधिकारी श्री. साळुंखे, तसेच Feeding India आणि Plug-In Kitchen टीमचे सदस्य – डॉ. पवनकुमार पाटील, शीन बुजु, हिमांशू सिंह, अनीश मेनन, करणजी, राकेशजी आणि अशोक तांबोळी सर उपस्थित होते.
हा उपक्रम अंगणवाडीतील बालकांच्या आरोग्य आणि पोषणाच्या दृष्टीने एक मोठे पाऊल ठरत असून, शासन आणि सामाजिक संस्थांच्या सहकार्याने ग्रामीण भागातील बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी एक नवा आदर्श निर्माण करत आहे.
#Nandurbar#FeedingIndia#PlugInKitchen#ChildNutrition#Anganwadi#Taloda#DrMittaliSethi#WomenAndChildDevelopment#PoushtikBhojan#BalVikas#PoshanAbhiyan#MaharashtraDevelopment#NandurbarUpdates