Home नंदुरबार जिल्हा नंदुरबार जिल्ह्यात ‘स्वच्छता ही सेवा 2025’ उपक्रमाचा कोठली खु. येथे जिल्हास्तरीय शुभारंभ

नंदुरबार जिल्ह्यात ‘स्वच्छता ही सेवा 2025’ उपक्रमाचा कोठली खु. येथे जिल्हास्तरीय शुभारंभ

3
Kothli Khu of 'Swachhata Hi Seva 2025' initiative in Nandurbar district. District level launch here

“स्वच्छता ही सेवा 2025” या महत्वाकांक्षी उपक्रमाचा जिल्हास्तरीय शुभारंभ आज कोठली खु., ता. नंदुरबार येथे उत्साहात करण्यात आला. या उपक्रमाचा प्रारंभ मा.आमदार डॉ. विजयकुमार गावित व जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते ग्रामस्थ व विद्यार्थ्यांना स्वच्छतेची शपथ घेण्यात आली.

या प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. कुमुदिनी गावित, डॉ. सुप्रिया गावित, उपमुख्य कार्यकारी अधिकारी उदयकुमार कुसुरकर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी उपस्थितांना शपथ देऊन गावांमध्ये शाश्वत स्वच्छतेसाठी काही महत्त्वपूर्ण संदेश दिले. त्यात –

ओला व सुका कचरा वेगळा करण्याची शिस्त

सांडपाण्याचे योग्य व्यवस्थापन

यावर विशेष भर देण्यात आला.

यानंतर डॉ. विजयकुमार गावित, सीईओ नमन गोयल, डॉ. सुप्रिया गावित, राजश्री गावित, गटविकास अधिकारी अनिल बिराडे, सरपंच महेंद्र वळवी, उपसरपंच जगदीश पाटील, विस्तार अधिकारी वाय. डी. पाटील, एस. व्ही. दसपुते यांच्यासह ग्रामस्थांनी परिसर स्वच्छता करून उपक्रमाचा प्रत्यक्ष शुभारंभ केला.

👉 या उपक्रमामुळे गावात केवळ स्वच्छता नव्हे तर आरोग्य, पर्यावरण व शाश्वत विकासासाठी जागरूकता निर्माण होणार आहे.

#नंदुरबार#स्वच्छताहीसेवा2025#डॉमित्तालीसेठी#डॉविजयकुमारगावित#ग्रामीणविकास#स्वच्छताअभियान#CleanIndia