
नटराज पुरस्कार, विश्वकर्मा पुरस्कार आणि क्रांतीवीर राजे उमाजी नाईक या पुरस्कारासाठी इच्छुक व्यक्ती तसेच उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्थांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या पुरस्कारासाठी इच्छुक व्यक्ती व संस्थांनी ३ मार्च २०२६ पर्यंत अर्ज करावे, असे आवाहन सहायक संचालक इतर मागास बहुजन कल्याण मुंबई उपनगर यांनी केले आहे.
पुरस्कारासाठी अर्ज करणारी व्यक्ती, संस्था महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे. अर्जदाराने संबंधित समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक अथवा अन्य क्षेत्रातील उत्थानासाठी सलग व उल्लेखनीय स्वरूपाचे कार्य केलेले असावे. अर्ज विहित नमुन्यात सादर करणे बंधनकारक असून शासन निर्णयात नमूद केलेली सर्व आवश्यक कागदपत्रे, कार्याचा सविस्तर अहवाल, शिफारस पत्रे व प्रमाणपत्रे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.
अर्जाचा नमुना, शासन निर्णयातील सविस्तर अटी व शर्ती तसेच पुरस्कारांबाबतची अधिक माहिती सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, मुंबई उपनगर (चौथा मजला, नवीन प्रशासकीय इमारत, आर.सी.चेंबुरकर मार्ग, चेंबुर (पूर्व) ४०००७१ येथे उपलब्ध असून दि. ३ मार्च २०२६ सायं. ५ पर्यंत संबंधित पुरस्कारासाठीचे प्रस्ताव या कार्यालयास करणेकरीता मुदतवाढ देण्यात आली असल्याचे प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.















