Home लाईफस्टाईल शैक्षणिक महाराष्ट्रातील गुणवंत विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या उच्च शिक्षणाच्या अधिक संधी

महाराष्ट्रातील गुणवंत विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या उच्च शिक्षणाच्या अधिक संधी

0
महाराष्ट्रातील गुणवंत विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या उच्च शिक्षणाच्या अधिक संधी
More opportunities for world-class higher education for talented students from Maharashtra

ब्रिस्टॉल विद्यापीठासारख्या जागतिक कीर्तीच्या संस्थेसोबत करार होणे ही अभिमानाची बाब आहे. या सहकार्यामुळे गुणवत्तापूर्ण शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या आणि त्यासाठी सक्षम असलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना मोठी संधी उपलब्ध होणार आहे. शासन आणि अकॅडेमिया एकत्र आले तर आपण नक्कीच उज्ज्वल भविष्य निर्माण करू शकतो, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, ब्रिस्टॉल विद्यापीठाच्या कुलगुरू व अध्यक्षा प्रा.एव्हलिन वेल्च, ब्रिस्टॉल विद्यापीठाच्या मुख्य संचालन अधिकारी लुसिंडा पार, संचालक ज्युलिया हॉल, मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विन दामेरा आदी उपस्थित होते.

सामाजिक व आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना उच्च प्रतीचे शिक्षण मिळावे, हा या योजनेमागील प्रमुख उद्देश आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पदवी अभ्यासक्रमाच्या संपूर्ण कालावधीसाठी १०० टक्के शिक्षण शुल्क माफ करण्यात येईल. या शिष्यवृत्तीचा संपूर्ण खर्च ब्रिस्टॉल विद्यापीठ मुंबई कॅम्पसकडून उचलण्यात येणार आहे.

#सामंजस्यकरार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here