Home नंदुरबार जिल्हा पालकमंत्र्यांच्या हस्ते स्वातंत्र्य दिनाचे मुख्य ध्वजारोहण;सकाळी 9.05 वाजता होणार सोहळा

पालकमंत्र्यांच्या हस्ते स्वातंत्र्य दिनाचे मुख्य ध्वजारोहण;सकाळी 9.05 वाजता होणार सोहळा

1
Main Independence Day flag-hoisting ceremony to be performed by the Guardian Minister; event scheduled for 9:05 AM.

(नंदुरबार) भारताचा 80 वा स्वातंत्र्य दिन शनिवार, दिनांक 15 ऑगस्ट 2026 रोजी नंदुरबार येथे सन्मानपूर्वक साजरा करण्यात येणार आहे. मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा सकाळी 9.05 वाजता जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला असून राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन सकिना मियालाल मुश्रीफ यांच्या हस्ते हा ध्वजारोहण सोहळा पार पडणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी आशा संघवी यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे.

जिल्हा मुख्यालयातील ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय सोहळा राज्यभर एकाच वेळी सकाळी 9.05 वाजता आयोजित केला जातो. त्यामुळे या मुख्य सोहळ्याचे गांभीर्य लक्षात घेऊन सकाळी 8.35 ते 9.35 या वेळेत कोणताही इतर शासकीय किंवा निमशासकीय ध्वजारोहण सोहळा आयोजित करू नये, इतर कार्यालये अथवा संस्थांना स्वतःचा ध्वजारोहण सोहळा करायचा असल्यास त्यांनी तो सकाळी 8.35 च्या पूर्वी किंवा सकाळी 9.35 च्या नंतर आयोजित करावा, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

या मुख्य शासकीय सोहळ्यास जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, स्वातंत्र्य सैनिक, शहीद जवानांच्या धर्मपत्नी व आई-वडील, शौर्य पुरस्कार विजेते, विविध राजकीय पक्षांचे प्रमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त व्यक्ती, आणीबाणीच्या काळात कारावास भोगलेल्या व्यक्ती, स्थानिक शासकीय अधिकारी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन नंदुरबार जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे, असेही निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती संघवी यांनी या शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.