Home नंदुरबार जिल्हा माजी मंत्री आ.डॉ.विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त डॉक्टर हिना आणि डॉक्टर सुप्रिया यांच्या...

माजी मंत्री आ.डॉ.विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त डॉक्टर हिना आणि डॉक्टर सुप्रिया यांच्या प्रमुख उपस्थितीत मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात संपन्न

0
A marathon competition was held with great enthusiasm to mark the birthday of former Minister Dr. Vijaykumar Gavit, in the distinguished presence of Dr. Hina and Dr. Supriya.

नंदुरबार(प्रतिनिधी):-महाराष्ट्राचे माजी आदिवासी विकास मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्यातील भाजपाचे ज्येष्ठ नेते आमदार डॉ. विजयकुमार गावित यांचा 15 ऑगस्ट 2026 रोजी वाढदिवस आहे. या पार्श्वभूमीवर विजय गौरव क्रीडा महोत्सव समितीच्या वतीने दरवर्षाप्रमाणे यंदाही आयोजित करण्यात आलेली मॅरेथॉन स्पर्धा माजी खासदार डॉ. हिना गावित व भाजपा अनुसूचित जमाती मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत अत्यंत उत्साहात पार पडली. सदर स्पर्धा आज 14 ऑगस्ट 2026 शुक्रवार रोजी सकाळी 7 वाजता आमदार डॉ. विजयकुमार गावित यांच्या निवास स्थानापासुन करण्यात आली. पुरुष गटात 52 खेळाडू व महिला गटात 20 खेळाडूंनी सहभाग नोंदवला. पुरुष व महीला गटाला  माजी खासदार डॉ. हिना गावित व भाजपा अनुसूचित जमाती मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवुन सुरुवात करण्यात आली. स्पर्धेत सहभागी सर्व खेळाडूंचे त्यांनी अभिनंदन केले.
या स्पर्धेचा मार्ग माजी मंत्री आमदार डॉ. विजयकुमार गावित यांच्या निवास स्थानापासून यशवंत विद्यालय – जी.टी.पाटील महाविद्यालय रोड – आंधारे चौक – राणा प्रताप पुतळा बस स्टॅण्ड नेहरु पुतळा गांधी पुतळा उड्डाण पुल गिरीविहार गेट स्वागत पेट्रोलपंप – करण चौफुली – पातोंडा गाव, सप्तश्रृंगी मंदिरापर्यंत परत या मार्गे डॉ. विजयकुमार गावित यांच्या निवास स्थानापर्यंत असा होता. यात विजयी होणाऱ्या प्रथम पाच क्रमांकांना रोख पारितोषिक सन्मान चिन्ह व प्रशस्ती प्रमाण पत्र घोषित करण्यात आले आहे.
पुरुष गट 21 कि. मी. मॅरेथॉन स्पर्धेत पात्र ठरलेले पाच खेळाडू असे – 1. जगन्नाथ ऊलुशा पवार, कालधर साक्री,प्रथम, 2. दुर्गेश महेंद्र अहिरे, जिजामाता महाविद्यालय, नंदुरबार, व्दितीय, पिंट्या दित्या वसावे, गोरंबा, धडगाव, तृतीय, लारा जहांगीर पटले, धडगाव, चौथा, आमशा सरपा वसावे, निंबापाटी, अक्कलकुवा, पाचवा. महिला गट 10 कि.मी. मॅरेथॉन स्पर्धेतील बक्षिस पात्र ठरलेले पाच खेळाडू – शकिला बाशा वसावे, नंदलवड, धडगाव, प्रथम. मिना रायसिंग वसावे, अक्कलकुवा, व्दितीय. पारांती दादी पाडवी, अक्कलकुवा, तृतीय. सोकी सिताराम पावरा, सिंधी दिगर, तोरणमाळ, चौथा.  बालीका बन्सीलाल वसावे, धडगाव, पाचवा. या सर्व 10  बक्षिस पात्र खेळाडूंना अनुक्रमे प्रथम क्र. रु.11000 स्मृतीचिन्ह, प्रशस्ती प्रमाणपत्र, व्दितीय क्र. रु.7100 स्मृतीचिन्ह, प्रशस्ती प्रमाणपत्र, तृतीय क्र. रु5100 स्मृतीचिन्ह, प्रशस्ती प्रमाणपत्र, चौथा क्र. रु.3100 स्मृतीचिन्ह, प्रशस्ती प्रमाणपत्र,  पावचा क्र. रु. 2100 स्मृतीचिन्ह, प्रशस्ती प्रमाणपत्र असे पारितोषिक दिले जाणार आहे.
वरील सर्व बक्षिस पात्र स्पर्धकांना डॉ. विजयकुमार गावित साहेब यांच्याहस्ते दि. 26 ऑगस्ट 2026 शुक्रवार रोजी पारितोषीके वितरीत करण्यात येतील. असे विजय गौरव क्रीडा महोत्सव समितीच्या वतीने कार्याध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर ईश्वर धामणे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. वरील दोन्हीही गटातील मॅरेथॉन स्पर्धा यशस्वी करण्यात डॉ. ईश्वर धामणे, बळवंत निकुम, राजेश शाह, नितीन कबाडे, भागुराव जाधाव, अमृत भट, खुशाल शर्मा, प्रकाश गवळे, ईश्वरभाई पटेल, सौरभ राजपूत, दिपेश धामणे, राजधर बेडसे, बाबु वळवी, रवी पाडवी, दिनेश ठाकरे, किशोर तांबोळी, नरेंद्र मोरे, करण भिल, शुभम शर्मा, अशोक नाईक, शिंदे, पोलिस डिपार्टमेंट, वैद्यकीय पथक, यांनी मोलाचे सहकार्य केले.