तुळसवडे केंद्रशाळेची शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तुंग भरारी ध्रुव किंजळस्कर राष्ट्रीय गुणवत्तेत 3 रा, कु. श्रुती घुमे जिल्ह्यात 93 वी

राजापूर(प्रतिनिधी):-जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्रशाळा तुळसवडे नं. 1 (ता. राजापूर, जि. रत्नागिरी) या शाळेतील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत उत्कृष्ट यश संपादन करत शाळेच्या आणि गावाच्या लौकिकात मोलाची भर घातली आहे. शाळेने शिष्यवृत्ती परीक्षेत 100% निकालाची परंपरा कायम राखत दैदिप्यमान भरारी घेतली आहे. या परीक्षेत इयत्ता चौथीचा विद्यार्थी चि. ध्रुव प्रिया प्रवीण किंजळस्कर याने अत्यंत चमकदार कामगिरी […]
तुळसवडे केंद्रशाळेची शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तुंग भरारी ध्रुव किंजळस्कर राष्ट्रीय गुणवत्तेत 3 रा, कु. श्रुती घुमे जिल्ह्यात 93 वी
Tulsavade Central School Achieves Remarkable Success in Scholarship Exam: Dhruv Kinjalkar Ranks 3rd Nationally; Ms. Shruti Ghume Ranks 93rd in the District.

राजापूर(प्रतिनिधी):-जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्रशाळा तुळसवडे नं. 1 (ता. राजापूर, जि. रत्नागिरी) या शाळेतील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत उत्कृष्ट यश संपादन करत शाळेच्या आणि गावाच्या लौकिकात मोलाची भर घातली आहे. शाळेने शिष्यवृत्ती परीक्षेत 100% निकालाची परंपरा कायम राखत दैदिप्यमान भरारी घेतली आहे. या परीक्षेत इयत्ता चौथीचा विद्यार्थी चि. ध्रुव प्रिया प्रवीण किंजळस्कर याने अत्यंत चमकदार कामगिरी करत राष्ट्रीय ग्रामीण गुणवत्ता यादीत 3 रा क्रमांक पटकावून सुवर्णयश संपादन केले आहे. तर इयत्ता सातवीची विद्यार्थिनी कु. श्रुती भास्कर घुमे हिने ‘जिल्हा ग्रामीण गुणवत्ता यादीत 93 वा क्रमांक मिळवून उल्लेखनीय यश प्राप्त केले आहे. या दोघांच्या यशामुळे तुळसवडे परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
शाळेतील सर्व शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन, विद्यार्थ्यांची जिद्द आणि परिश्रम यामुळेच शाळेचा निकाल 100% लागला असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
या यशोशिखरावर पोहोचलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचे, त्यांना मार्गदर्शन करणारे मुख्याध्यापक श्री. प्रवीण किंजळस्कर गुरुजी, प्रसाद दरडे, मुंडे आणि सर्व शिक्षक बांधवांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती तुळसवडे, सर्व शिक्षकवृंद, केंद्र तुळसवडे व ग्रामस्थांच्या वतीने यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील वाटचालीस उदंड शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: