Home महाराष्ट्र महानगर पालिका, एमएसआयडीसी, मिहान,विभागीय क्रीडा संकुल

महानगर पालिका, एमएसआयडीसी, मिहान,विभागीय क्रीडा संकुल

2
Metropolitan Municipality, MSIDC, MIHAN, Divisional Sports Complex

वैद्यकीय शिक्षण व सुविधा आणि म्हाडा अंतर्गत नागपूर शहरातील विविध विकास प्रकल्प नियोजित वेळेत गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्याची दक्षता घेण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा बैठकीत संबंधित यंत्रणांना दिल्या.

नागपूर महानगरपालिकेअंतर्गत १ लाख लोकसंख्या असलेल्या वस्त्यांमध्ये झोननिहाय भाजी बाजार, मटन-मच्छी मार्केट,फूड मॉल व हॉकर झोन उभारण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. ही कामे पूर्ण करताना पार्किंगची योग्य ती व्यवस्था करण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिले त्यासाठी ‘एकात्मिक विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली’चा आधार घ्यावा व आवश्यक बदल करावे अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

येथील मुख्यमंत्री सचिवालयात (हैदराबाद हाऊस) शहरातील विविध प्रकल्पांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या बैठकीस केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार माया इवनाते, आमदार मोहन मते आणि कृष्णा खोपडे, नागपूरच्या महापौर नीता ठाकरे, गृह निर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव असीम कुमार गुप्ता, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, मनपा आयुक्त डॉ. विपीन इटनकर, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आदी यावेळी उपस्थित होते.

पार्किंग बाबत आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून तोडगा काढावा, अशा सूचना केंद्रीय मंत्री श्री. गडकरी यांनी बैठकीत दिल्या.