Home नंदुरबार जिल्हा केव्हीके नंदुरबार येथे मिलेट्स महोत्सव उत्साहात संपन्न

केव्हीके नंदुरबार येथे मिलेट्स महोत्सव उत्साहात संपन्न

1
Millets Festival concludes with enthusiasm at KVK Nandurbar

(नंदुरबार) शेतकऱ्यांचे सक्षमीकरण, भरडधान्य पिकांचा प्रचार-प्रसार, प्रक्रिया व मूल्यवर्धनाच्या संधी निर्माण करणे तसेच उत्पादित मालाला बाजारपेठेशी जोडणी मिळवून देण्याच्या उद्देशाने कृषी विज्ञान केंद्र, नंदुरबार यांच्या वतीने सेल्को फाउंडेशन व मिलेट नाऊ यांच्या सहकार्याने मिलेट्स महोत्सव २०२६ यशस्वीरीत्या पार पडला.

कार्यक्रमाची सुरुवात वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख श्री. राजेंद्र दहातोंडे यांच्या प्रास्ताविकाने झाली. त्यांनी शाश्वत शेतीसाठी मिलेट्स पिकांचे महत्त्व, त्यांचे उच्च पोषणमूल्य तसेच प्रक्रिया क्षेत्रातील वाढत्या व्यवसायिक संधी याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे उद्घाटन मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास विविध विभागांचे मान्यवर अधिकारी व तज्ज्ञ उपस्थित होते.

मार्गदर्शन करताना मा. डॉ. मित्ताली सेठी यांनी मिलेट्स पिकांचे पोषणमूल्य अधोरेखित करत पर्यावरणपूरक पॅकेजिंगचा वापर करण्याचे आवाहन केले. तांत्रिक सत्रांमध्ये तज्ज्ञांनी मिलेट्स प्रक्रिया तंत्रज्ञान, मूल्यसाखळीतील संधी, तसेच मिलेट्सपासून तयार होणाऱ्या कुकीज, लाडू, न्यूट्रीबार व प्रीमिक्स यांसारख्या मूल्यवर्धित पदार्थांबाबत माहिती दिली.

यावेळी भरडधान्यांपासून तयार करण्यात आलेल्या विविध पौष्टिक पदार्थांची प्रदर्शनीही आयोजित करण्यात आली. कार्यक्रमामुळे शेतकऱ्यांना मिलेट्स पिकांचे उत्पादन, प्रक्रिया, मूल्यवर्धन व बाजारपेठेतील संधी याबाबत सखोल माहिती मिळाली. यामुळे शाश्वत उपजीविका, पोषण सुरक्षा आणि आर्थिक सक्षमीकरणाला चालना मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.

.

.

.

#MilletsFestival#KVKNandurbar#Nandurbar#MilletsPromotion#FarmersEmpowerment#NutritionSecurity#SustainableAgriculture#ValueAddition#HealthyFood#AtmanirbharBharat