Home नंदुरबार नंदुरबार: वेठबिगार व असंघटित कामगार समितीच्या बैठकीत कामगारांच्या कल्याणासाठी महत्त्वपूर्ण निर्णय

नंदुरबार: वेठबिगार व असंघटित कामगार समितीच्या बैठकीत कामगारांच्या कल्याणासाठी महत्त्वपूर्ण निर्णय

3
Nandurbar: Important decisions for the welfare of workers taken in the meeting of the Forced Labor and Unorganized Workers Committee

जिल्ह्यातील वेठबिगार कामगार व असंघटित कामगारांच्या समस्या जाणून घेऊन त्यांचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार येथे जिल्हा वेठबिगार दक्षता समिती आणि जिल्हास्तरीय असंघटित कामगार समितीची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी होत्या.

बैठकीत उपस्थित मान्यवर:

⦁ मा.पोलीस अधीक्षक, नंदुरबार यांचे प्रतिनिधी

⦁ श्रीमती मधुरा सूर्यवंशी – सरकारी कामगार अधिकारी, नंदुरबार

⦁ श्री.अभिषेक चोळके – लिपिक

⦁ श्री.मयुर पवार – तालुका कामगार सुविधा केंद्र

मुख्य चर्चेचे मुद्दे:

⦁ वेठबिगार कामगार नोंदणी – जिल्ह्यातील वेठबिगार कामगारांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी नोंदणी प्रक्रिया अधिक गतिमान करण्याबाबत चर्चा झाली.

⦁ बांधकाम कामगारांचे ओळखपत्र वाटप – महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ अंतर्गत नोंदणीकृत बांधकाम कामगारांना ओळखपत्र व पावत्यांचे वितरण करण्याचे नियोजन करण्यात आले.

⦁ ई-श्रम योजना – ई-श्रम पोर्टलवर नोंदणीकृत कामगारांना विमा योजनांचा लाभ देण्यासाठी अर्ज प्रक्रियेत सुलभता आणण्याबाबत चर्चा.

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे निर्देश:

⦁ जिल्ह्यातील विठभट्टी धारकांची नोंदणी करून त्यांना आवश्यक मूलभूत सुविधा पुरवाव्यात.

⦁ ESIC अंतर्गत वैद्यकीय सुविधा कामगारांना तत्काळ उपलब्ध करून द्याव्यात.

⦁ ई-पहचानपत्रे कामगारांना वितरीत करण्यावर भर द्यावा.

⦁ भांडे वाटपासाठी ग्रामपंचायत निहाय नियोजन करावे.

⦁ कामगारांसाठी हेल्पलाईन नंबर सुरू करावा.

⦁ कामगारांच्या लहान मुलांसाठी पाळणाघर सुरू करण्याचे नियोजन करावे.

#नंदुरबार#कामगारकल्याण#डॉमित्तालीसेठी#VeṭhbigarSamiti#UnorganisedWorkers#ESIC#Eshram#DistrictAdministration