(तळोदा) घरगणना प्रक्रियेची अचूकता आणि प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी सहाय्यक जिल्हाधिकारी तळोदा अनय नावंदर, यांनी तळोदा नगर परिषद हद्दीतील विविध भागांना भेट देऊन प्रगणकांकडून सुरू असलेल्या घरगणना कार्याची प्रत्यक्ष पडताळणी केली.
यावेळी प्रगणक नागरिकांच्या घरी भेट देऊन मोबाईल ॲपच्या माध्यमातून माहिती संकलित करत असल्याची पाहणी करण्यात आली. घरगणना प्रक्रियेदरम्यान माहितीची अचूक नोंद, नागरिकांशी संवाद तसेच निर्धारित मार्गदर्शक सूचनांचे पालन याबाबतही आढावा घेण्यात आला.
आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने राबविण्यात येत असलेल्या या प्रक्रियेमुळे माहिती संकलन अधिक पारदर्शक, वेगवान आणि विश्वासार्ह होत असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
घरगणना ही प्रशासनाच्या नियोजन आणि विकास प्रक्रियेसाठी अत्यंत महत्त्वाची असल्याने नागरिकांनीही योग्य माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.
#HouseListing#CensusSurvey#Taloda#Nandurbar#DigitalSurvey#GoodGovernance#DistrictAdministration#तळोदा#घरगणना#डिजिटलघरगणना#नंदुरबार#जिल्हाप्रशासन#सुशासन#माहितीसंकलन