Home महाराष्ट्र शहीदी समागम कार्यक्रमात पंचक्रोशीतील गावांचा सहभागासाठी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांचा पुढाकार

शहीदी समागम कार्यक्रमात पंचक्रोशीतील गावांचा सहभागासाठी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांचा पुढाकार

0
शहीदी समागम कार्यक्रमात पंचक्रोशीतील गावांचा सहभागासाठी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांचा पुढाकार
Resident Deputy Commissioner takes initiative for participation of villages in Panchkroshi in Shaheedi Samagam program

नांदेड : शिख पंथाचे नववे गुरु श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रमानिमित्त नांदेड शहर व पंचक्रोशीतील गावकऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग मिळावा, यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांनी लंगर साहिब गुरुद्वारा येथे भेट देऊन बाबा बलविंदरसिंगजी यांच्याशी चर्चा केली.

यावेळी बाबा बलवंदरसिंग यांनी नांदेड शहरासह पंचक्रोशीतील सर्व नागरिकांना आवाहन केले की, शनिवार २४ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ८ वाजता तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारा येथून निघणाऱ्या भव्य नगर किर्तनात नागरिकांनी, महिला, युवक व बालगोपालांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. तसेच प्रत्येक गावातून किमान एक दिंडी भजन मंडळासह नगर किर्तनात सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी केले.

श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांनी धर्म, मानवी हक्क व समाजहितासाठी दिलेल्या बलिदानाचा गौरवशाली इतिहास समाजापर्यंत पोहोचावा, यासाठी जनसहभाग अत्यंत महत्त्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले. नगर किर्तनाच्या माध्यमातून त्याग, बलिदान व सामाजिक ऐक्याचा संदेश संपूर्ण देशभर पोहोचेल आणि श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांना हीच खरी अभिवादन ठरेल, असे बाबा बलविंदरसिंग यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here