कोपरगाव तालुक्यातील मौ. खिर्डी गणेश येथे भारतीय रेल्वेच्या लोखंडी कुंपणामुळे ८ शेतकरी कुटुंबांचा रस्ता बंद झाला होता. हा प्रलंबित प्रश्नावर तहसीलदार महेश सावंत यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून सामंजस्याने मार्गी लावला.
शेतकऱ्यांसाठी नवीन रस्ता खुला करण्यात आला असून, ‘बांधावरच न्यायनिवाडा’ उपक्रमांतर्गत मिटवलेला या वर्षातील हा ७० वा शेतरस्ता विवाद ठरला आहे. प्रशासनाच्या या तत्परतेबद्दल शेतकरी बांधवांनी आभार व्यक्त केले आहेत.
#कोपरगाव#अहिल्यानगर#शेतरस्ता#बांधावरच_न्यायनिवाडा#बळीराजा#Kopergaon#Ahilyanagar#FarmerJustice#RoadIssueResolved#RuralDevelopment#किसान_कल्याण#न्याय#MahaAdmin#FarmerSupport#VillageRoads#SuccessStory
















