Home शहादा शहाद्यात शनिवारी शिवसेनेचा पक्षप्रवेश व पदाधिकारी नियुक्ती विचार-विनिमय मेळावा

शहाद्यात शनिवारी शिवसेनेचा पक्षप्रवेश व पदाधिकारी नियुक्ती विचार-विनिमय मेळावा

1
Shiv Sena induction and office-bearer appointment consultation meet in Shahada on Saturday

शहादा(प्रतिनिधी):-शिवसेना शहर व तालुक्याच्या वतीने भव्य पक्षप्रवेश तसेच पदाधिकारी नियुक्ती विचार- विनिमय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा शनिवार 18 जुलै 2026 रोजी सकाळी 10 वाजता शहरातील मीरा प्रताप लॉन्स, बायपास रोड येथे पार पडणार आहे.
या मेळाव्यास शिवसेनेचे नेते आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमश्या पाडवी, नंदुरबार लोकसभा संपर्क प्रमुख माजी आमदार शिरीष चौधरी, जिल्हा प्रमुख ॲडहोकेट राम रघुवंशी यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. मेळाव्यात विविध पक्षांतील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश होणार असून, शहर व तालुकास्तरीय पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीबाबतही विचार-विनिमय करून महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जाणार आहेत.
शहादा शहर व तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक तसेच शिवसेनेवर प्रेम करणारे नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावा असे आवाहन उपजिल्हाप्रमुख डॉ.राजेंद्र पेंढारकर, शहर प्रमुख जितेंद्र जमदाडे,तालुका प्रमुख मनलेश जयस्वाल यांनी केले आहे.