Home नंदुरबार जिल्हा नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयात जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त कार्यक्रम

नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयात जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त कार्यक्रम

1
Program at Natavadkar Junior College to mark World Population Day

नंदुरबार(प्रतिनिधी):-येथील एकलव्य विद्यालय व ज.ग.नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयात जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डी के मराठे, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. गिरीश पवार तसेच पर्यवेक्षक टी. एन. पाडवी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वतीच्या प्रतिमेस माल्यार्पण करून झाली. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे भूगोल विषयाचे प्रमुख प्राध्यापक चंद्रकांत देसले हे प्रमुख वक्ते होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विज्ञान शाखेतील विद्यार्थिनींनी लोकसंख्या दिन साजरा करण्याची आवश्यकता या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते यांनी विद्यार्थ्यांना लोकसंख्या दिनानिमित्त मार्गदर्शन केले. भारत हा सर्वात जास्त लोकसंख्येचा देश आहे तसेच सर्वात जास्त युवकांची संख्या असणारा सुद्धा हा आपला देश आहे. त्यामुळे आपण पृथ्वीवर भार होण्यापेक्षा किमान एक कौशल्य आत्मसात करून देशाला मदतच केली पाहिजे असे वक्तव्य चंद्रकांत देसले यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बारावी विज्ञान शाखेची विद्यार्थिनी गौरी बैरागी व आभार प्रदर्शन विज्ञान शाखेची विद्यार्थिनी चेतना हिने केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व प्राध्यापक वृंदांनी सहकार्य केले.