शहादा: भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी; लोणखेडा कॉलेजसमोरील भीषण अपघात

शहादा:रस्त्यावरील अनियंत्रित आणि भरधाव वेगामुळे होणाऱ्या अपघातांची मालिका सुरूच आहे. शहादा जवळील लोणखेडा कॉलेजजवळ एका भरधाव कारने दिलेल्या जोरदार धडकेत एक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या भीषण अपघातात दुचाकीचेही मोठे नुकसान झाले असून, कार चालकाविरुद्ध शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहादा: भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी; लोणखेडा कॉलेजसमोरील भीषण अपघात
Shahada: Two-wheeler rider critically injured after being hit by a speeding car; severe accident in front of Lonkheda College.

कॉलेजजवळ काळाचा घालाधडगाव तालुक्यातील बिलबारपाडा येथील रहिवासी असलेले रामा वानका पावरा (वय ४२) हे आपल्या दुचाकीने (क्रमांक: एमएच ३९ एल २१२२) चिरखान ते लोणखेडा रस्त्याने धडगावच्या दिशेने जात होते. ते लोणखेडा कॉलेजजवळ पोहोचले असता, समोरून अत्यंत भरधाव आणि निष्काळजीपणे आलेल्या एका कारने (क्रमांक: जीजे १६ डीजी २२०६) त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. धडक इतकी भीषण होती की रामा पावरा रस्त्यावर फेकले गेले आणि गंभीर जखमी झाले.कार चालकावर गुन्हा दाखल; पोलीस तपास सुरूया अपघातानंतर जखमी रामा पावरा यांनी स्वतः शहादा पोलीस ठाण्यात अज्ञात/संबंधित कार चालकाविरोधात रीतसर फिर्याद दिली. त्यांच्या तक्रारीवरून शहादा पोलिसांनी कार चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम २८१, १२५ (अ) (ब), ३२४ (४) सह मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस नाईक अविनाश कोकणी करत आहेत. वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर वाहनधारकांनी वेगावर नियंत्रण ठेवावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250