7 सप्टेंबर रोजी ‘डाक अदालत’; ग्राहकांच्या प्रलंबित तक्रारींचे होणार निवारण

(नंदुरबार) टपाल विभागाच्या कामकाजाबाबत ग्राहकांच्या प्रलंबित तक्रारींचे निवारण करण्यासाठी धुळे येथे तिमाही डाक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. ही डाक अदालत प्रवर अधीक्षक डाकघर, धुळे विभाग यांच्या कार्यालयात 07 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 11:00 वाजता पार पडणार आहे.
7 सप्टेंबर रोजी ‘डाक अदालत’; ग्राहकांच्या प्रलंबित तक्रारींचे होणार निवारण
‘Dak Adalat’ on September 7; pending customer complaints to be resolved.

पोस्टाच्या कार्यपद्धती किंवा कामकाजाबाबत केलेल्या ज्या तक्रारींचे निवारण मागील 6 आठवड्यांच्या आत झालेले नाही, अशाच तक्रारींची दखल या डाक अदालतीत घेतली जाईल. यामध्ये प्रामुख्याने:
• सामान्य टपाल व स्पीड पोस्ट
• काउंटर सेवा
• पार्सल सुविधा
• बचत बँक व मनी ऑर्डर
या सेवांशी संबंधित तक्रारींचा विचार केला जाणार आहे.
ग्राहकांनी आपल्या तक्रारीमध्ये तारीख, मूळ तक्रार ज्या अधिकाऱ्याकडे पाठवली होती त्यांचे नाव, हुद्दा आणि तक्रार पाठवल्याचा संपूर्ण तपशील स्पष्टपणे नमूद करणे आवश्यक आहे.
संबंधित नागरिकांनी डाकसेवेबाबतची आपली तक्रार अतिरिक्त प्रतीसह ‘प्रवर अधीक्षक डाकघर, धुळे विभाग, धुळे – 424001’ या पत्त्यावर 3 सप्टेंबर, 2026 पर्यंत पोहोचेल अशा बेताने पाठवावी, असे आवाहन डाक विभागातर्फे करण्यात आले आहे.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250