रुग्णांना दिलासा ओपीडी व नोंदणी कक्ष अखंडित सुरू ठेवण्याचे आदेश संसर्गजन्य तापाच्या पार्श्वभूमीवर जननायक बिरसा मुंडा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाचा निर्णय,सकाळी 8 ते सायंकाळी 6

नंदुरबार:-जिल्ह्यात संसर्गजन्य तापाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असताना जननायक बिरसा मुंडा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय प्रशासनाने रुग्णांच्या सोयीसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागाची (ओपीडी) सेवा आता सकाळी 8 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत पूर्णवेळ सुरू ठेवण्याचे आदेश अधिष्ठाता संजय राठोड यांनी दिले आहेत.
रुग्णांना दिलासा ओपीडी व नोंदणी कक्ष अखंडित सुरू ठेवण्याचे आदेश संसर्गजन्य तापाच्या पार्श्वभूमीवर जननायक बिरसा मुंडा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाचा निर्णय,सकाळी 8 ते सायंकाळी 6
To provide relief to patients, the administration of Jannayak Birsa Munda Government Medical College has decided to keep the OPD and registration counters operational without interruption—from 8 AM to 6 PM—amid the outbreak of infectious fevers.

रुग्णालयात येणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. रुग्णालयात वाढत असलेली रुग्णांची गर्दी आणि संसर्गजन्य तापाच्या पार्श्वभूमीवर रुग्णांना वेळेत तपासणी व उपचार मिळावेत, तसेच ओपीडीवरील ताण कमी व्हावा, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. सर्व चिकित्सालयीन विभाग प्रमुखांना आपल्या अधिपत्याखालील वरिष्ठ निवासी डॉक्टर (SR) व कनिष्ठ निवासी डॉक्टर (JR) यांच्या ओपीडीतील ड्युट्या तातडीने निश्चित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
याशिवाय ओपीडीमधील रुग्ण नोंदणी कक्षही सकाळी 8 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत कोणताही खंड न पडता अखंडितपणे सुरू ठेवण्याचे निर्देश वैद्यकीय अधीक्षकांना देण्यात आले आहेत. नोंदणीसाठी रुग्णांना दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागू नये आणि त्यानंतर तातडीने वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी नोंदणी कक्षाची व्यवस्था सुरळीत ठेवण्यावर भर देण्यात आला आहे. दरम्यान, वाढत्या रुग्णसंख्येमुळे रुग्णालयीन यंत्रणेवर निर्माण होणारा अतिरिक्त ताण लक्षात घेता सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सदर आदेशाची तात्काळ आणि काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता संजय राठोड यांनी दिले आहेत.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250