अक्कलकुवा येथे जा.इ.इ.उ.प्राथमिक उर्दू शाळेत तिसरी मासिक शिक्षण परिषद उत्साहात पडली पार पडली

अक्कलकुवा:-जा. इ. इ. उ. प्राथमिक उर्दू शाळा, अक्कलकुवा(जि.नंदुरबार) येथे 31 ऑगस्ट 2026 रोजी मासिक शिक्षण परिषदेचे 3 रे पुष्प अत्यंत उत्साहात व अभ्यासपूर्ण वातावरणात पार पडले. शाळेचे मुख्याध्यापक फारुकी जावेद इक्बाल सर आणि सर्व शिक्षक वृंद यांच्या विशेष प्रयत्नातून या शिक्षण परिषदेचे नेटके आयोजन करण्यात आले होते. या परिषदेस गटशिक्षणाधिकारीप्रशांत नरवडे यांनी अध्यक्ष व प्रेरणा अतिथी म्हणून, तर शिक्षण विस्तार अधिकारी कैलास लोहार आणि ललित बोरसे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहून मार्गदर्शन केले. दिवसभरात एकूण सहा सत्रांमध्ये ही शिक्षण परिषद संपन्न झाली.
अक्कलकुवा येथे जा.इ.इ.उ.प्राथमिक उर्दू शाळेत तिसरी मासिक शिक्षण परिषद उत्साहात पडली पार पडली
The third monthly educational conference was held with great enthusiasm at the Government Urdu Primary School in Akkalkuva.

केंद्रप्रमुख मोहम्मद आरिफ पिंजारी (C.H.) आणि CRG मार्गदर्शक फहीम अख्तर शेख यांनी विविध सत्रांचे संचालन केले, पहिल्या सत्रात केंद्रप्रमुख मोहम्मद आरिफ पिंजारी यांनी मागील महिन्यात वर्गांमध्ये झालेले काम, आलेल्या अडचणी व साध्य केलेल्या महत्त्वाच्या बाबींचा सविस्तर आढावा घेतला.
अनुभव व विचारांची देवाण -घेवाण, दुसऱ्या सत्रात फहीम अख्तर शेख यांनी शिक्षकांच्या अध्यापनातील नावीन्यपूर्ण प्रयोगांवर चर्चा घडवून आणली, ज्यामुळे शिक्षकांना एकमेकांच्या अनुभवांचा लाभ झाला. तिसऱ्या सत्रात पुढील महिन्याच्या अध्यापनाचे नियोजन, विषयनिहाय अध्ययन निष्पत्ती निश्चित करणे आणि शैक्षणिक साहित्याच्या वापराचे सविस्तर वेळापत्रक तयार करण्यात आले. चौथ्या सत्रात शाळा व्यवस्थापन समिती (SMC), पटसंख्या वाढवणे आणि गुणवत्ता वाढीत पालकांचा सहभाग यावर पिंजारी यांनी मार्गदर्शन केले. पाचव्या सत्रात शासनाच्या नवीन शैक्षणिक धोरणांची व जिल्हा स्तरावरून आलेल्या सूचनांची माहिती शिक्षकांना देण्यात आली. अंतिम सत्रात CRG च्या पुढील कामांची रूपरेषा ठरवून, मान्यवरांच्या मार्गदर्शनाने व आभार प्रदर्शनाने परिषदेचा यशस्वी समारोप झाला.
मुख्याध्यापक फारुकी जावेद इक्बाल व त्यांच्या संपूर्ण शिक्षक वृंदाने या परिषदेच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले. परिषदेच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल उपस्थित मान्यवरांनी शाळेचे कौतुक केले.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250