अक्कलकुवा तालुक्यातील साकलीउमर व वेली प्राथमिक आरोग्य केंद्रांची सीईओ नमन गोयल यांच्याकडून पाहणी
अक्कलकुवा तालुक्यातील साकलीउमर व वेली प्राथमिक आरोग्य केंद्रांची मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांच्याकडून पाहणी.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल (भाप्रसे) यांनी दिनांक २२ नोव्हेंबर २०२६ रोजी अक्कलकुवा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र साकलीउमर व वेली येथे समक्ष भेट देऊन तेथील आरोग्य सेवा आणि सुविधांचा सविस्तर आढावा घेतला.
या पाहणी दौऱ्यादरम्यान त्यांनी दोन्ही आरोग्य केंद्रांमधील औषधीसाठा, लसीकरणासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली शितसाखळी यंत्रणा (Cold Chain System), तसेच आंतररुग्ण (IPD) व बाह्यरुग्ण (OPD) विभागातील कामकाजाची पाहणी केली.
दुर्गम भागातील शेवटच्या घटकापर्यंत दर्जेदार आणि पूर्णवेळ आरोग्य सेवा अधिक प्रभावीपणे कशा पोहोचवता येतील, याबाबत त्यांनी उपस्थित वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना देऊन मार्गदर्शन केले.
Follow Us:

