नंदुरबार व शहादा येथे ० ते १८ वयोगटातील बालकांसाठी मोफत २डी इको (2D Echo) हृदयरोग तपासणी शिबिर

जिल्ह्यातील बालकांच्या आरोग्याचे संपूर्ण संरक्षण आणि संभाव्य हृदयविकाराचे वेळेवर निदान व्हावे, या उद्देशाने सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत (RBSK) ० ते १८ वर्ष वयोगटातील बालकांसाठी मोफत २डी इको (2D Echo) हृदयरोग तपासणी व निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
नंदुरबार व शहादा येथे ० ते १८ वयोगटातील बालकांसाठी मोफत २डी इको (2D Echo) हृदयरोग तपासणी शिबिर
free-2d-echo-heart-checkup-camp-children-nandurbar-shahada
          जन्मजात किंवा बालवयात आढळणाऱ्या हृदयाशी संबंधित समस्यांची वेळीच ओळख पटवून योग्य उपचार सुरू करता यावेत, हा या शिबिराचा मुख्य हेतू आहे.
शिबिराचे वेळापत्रक व ठिकाण
२६ नोव्हेंबर २०२६ गुरुवार जिल्हा रुग्णालय, नंदुरबार (DEIC विभाग) ० ते १८ वर्षे
२७ नोव्हेंबर २०२६ शुक्रवार ग्रामीण रुग्णालय, शहादा० ते १८ वर्षे
पालक व नागरिकांना आवाहन.
ज्या बालकांमध्ये श्वास घेण्यास त्रास होणे, लवकर थकवा येणे, अंग निळे पडणे, वजन न वाढणे किंवा हृदयाशी संबंधित कोणतीही लक्षणे अथवा शंका असल्यास, अशा बालकांसाठी हे शिबिर अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. तपासणी व निदानाची सुविधा पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
तरी नंदुरबार आणि शहादा परिसरातील नागरिकांनी व पालकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा आणि जास्तीत जास्त बालकांना निश्चित केलेल्या दिवशी व ठिकाणी तपासणीसाठी उपस्थित रहावे असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: