शहाद्यात आजपासून रंगणार भक्तीचा मळा; संत सेना महाराज पुण्यतिथीनिमित्त अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाचा शुभारंभ!

शहादा शहरात आजपासून भक्ती आणि प्रबोधनाचा अनोखा त्रिवेणी संगम पाहायला मिळणार आहे. संत शिरोमणी श्री संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून आज, मंगळवार दि. १ सप्टेंबर २०२६ पासून अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह सोहळ्याला अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात सुरुवात होत आहे. रोजच्या धकाधकीच्या जीवनात मनाला शांती देणाऱ्या आणि भक्तीचा संदेश देणाऱ्या या अध्यात्मिक सोहळ्याचा लाभ सर्व भाविकांनी घ्यावा, असे भावपूर्ण आवाहन शहादा पालिकेच्या नगरसेविका ममता हेमराज पवार आणि हेमराज प्रकाश पवार यांनी केले आहे.
शहाद्यात आजपासून रंगणार भक्तीचा मळा; संत सेना महाराज पुण्यतिथीनिमित्त अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाचा शुभारंभ!
A celebration of devotion begins in Shahada today; the 'Akhand Harinam Kirtan Saptah' (week-long continuous chanting and devotional singing) kicks off to mark the death anniversary of Saint Sena Maharaj!

साईबाबा नगरात भक्तीचा जागर; ८ सप्टेंबरपर्यंत रंगणार सोहळा
शहादा शहरातील साईबाबा नगर येथील श्री गोकर्णेश्वर महादेव मंदिर प्रांगणात हा भव्य सोहळा दि. १ सप्टेंबर ते ८ सप्टेंबर २०२६ दरम्यान पार पडणार आहे. या उत्सव काळात दररोज सायंकाळी साडे सहा ते रात्री १०.३० वाजेपर्यंत नामवंत कीर्तनकारांची कीर्तनरूपी सेवा होणार आहे. या धार्मिक सोहळ्याचे आयोजन नगरसेविका ममता हेमराज पवार यांच्या पुढाकाराने, श्री गोकर्णेश्वर महादेव मंदिर समिती आणि समस्त भाविकांच्या लोकसहभागातून व सहकार्यातून करण्यात आले आहे.
ह.भ.प. राज महाराज पाडळकर यांच्या कीर्तनाने प्रारंभ; सांगतेला महाप्रसाद
या सोहळ्याची सुरुवात आज दि. १ सप्टेंबर रोजी ह.भ.प. राज महाराज पाडळकर यांच्या रसाळ वाणीतून होणाऱ्या कीर्तनाने होणार आहे. यानंतर सप्ताहाच्या प्रत्येक दिवशी महाराष्ट्रातील विविध नामवंत कीर्तनकार आपल्या निरुपणातून भक्तीचा आणि समाजप्रबोधनाचा संदेश देतील. आठवडाभर चालणाऱ्या या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता दि. ८ सप्टेंबर २०२६ रोजी होणार असून, त्यादिवशी कीर्तनानंतर उपस्थित सर्व भाविकांसाठी भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. परिसरातील सर्व नागरिकांनी आणि विठ्ठलभक्तांनी या कीर्तन सप्ताहाचा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक समितीकडून करण्यात आले आहे.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250