नंदुरबारमध्ये रंगणार ‘अखिल भारतीय आदिवासी साहित्य संमेलन’; संस्कृती आणि मौखिक परंपरेच्या जतनासाठी साहित्यिकांचे विचारमंथन!
मौखिक परंपरेचे जतन आणि दस्तऐवजीकरणाचे आव्हान
बैठकीत उपस्थित साहित्यिकांनी आदिवासी साहित्याच्या सद्यस्थितीवर सखोल प्रकाश टाकला. आदिवासींची लोककथा, लोकगीते, पारंपरिक ज्ञान, निसर्गविषयक जाणिवा आणि त्यांची सामाजिक-सांस्कृतिक जीवनपद्धती यांचे पुरेसे दस्तऐवजीकरण (Documentation) न झाल्यामुळे हे वैभव समाजासमोर येऊ शकलेले नाही. त्यामुळे या संमेलनाच्या माध्यमातून आदिवासी साहित्याचे संकलन, लेखन, दस्तऐवजीकरण आणि त्यांच्या प्रकाशनावर विशेष भर दिला जाणार आहे.
साहित्यिकांची मांदियाळी आणि वैचारिक मंथन
संमेलनात काय असणार खास?
व्यारा येथे होणाऱ्या या दोन दिवसीय अखिल भारतीय संमेलनात आदिवासी साहित्याच्या विविध प्रवाहांवर सविस्तर चर्चा, वैचारिक मंथन, कविसंमेलन आणि काव्यवाचन यांसारख्या विविध भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल. केवळ पुस्तकी ज्ञानच नव्हे, तर आदिवासींची मूळ संस्कृती आणि त्यांच्या समृद्ध परंपरेचे थेट दर्शन घडवणारे विविध उपक्रम या संमेलनाचे मुख्य आकर्षण असतील, अशी माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे.या नियोजन बैठकीला गुजरात आणि महाराष्ट्रातील अनेक ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत उपस्थित होते. यामध्ये ज्येष्ठ साहित्यिक वाहरू सोनवणे, डॉ. जितेंद्र वसावा, सुनील गायकवाड, भीमसिंग वळवी, जेलसिंग पावरा, संतोष पावरा, सुमित्रा वसावे, ठाकोर चौधरी, डॉ. विमुख पटेल, अरविंद पटेल, ईश्वर पटेल, शैलेश चौधरी, बिपिन चौधरी, प्रा. सुलतान पवार, प्रा. महेंद्र गावीत आणि योगेश पावरा आदी मान्यवरांचा समावेश होता.

