ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या सुरक्षेसाठी काळ्या फिती लावून आंदोलनाचा इशारा

नंदुरबार जिल्ह्यात ग्रामपंचायत स्तरावर होणाऱ्या हेल्याच्या निषेधार्थ व सुरक्षिततेसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियनने आंदोलनाचा इशारा दिला आहे. ग्रामपंचायत अधिकाऱ्यांवर होणारे हल्ले, मानसिक त्रास आणि अनावश्यक प्रशासकीय दबाव थांबवावा, तसेच दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या सुरक्षेसाठी काळ्या फिती लावून आंदोलनाचा इशारा
Warning of protest with black armbands for the safety of Gram Panchayat officials.

येत्या १ सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील ग्रामपंचायत अधिकारी काळ्या फिती लावून काम करणार असून, मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे. સરपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामपंचायत अधिकारी यांच्यातील समन्वय वाढवून ग्रामपंचायत प्रशासनात सुरक्षित व सकारात्मक वातावरण निर्माण करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250