आदिवासी हस्त कौशल्य कलाकार शिवराम चौधरी यांची भोवाडा सोंगी मुखवटे कला पोहचली आंतरराष्ट्रीय स्तरावर

(सुरगाणा) आदिवासी हस्त कौशल्य कलाकार शिवराम चौधरी यांची भोवाडा सोंगी मुखवटे कला पोहचली आंतरराष्ट्रीय स्तरावर. भोवाडा सोंगी मुखवटे कलेची भुरळ बिग बी अमिताभ बच्चन यांनी केली कलेची वाहवा..!महाराष्ट्र राज्य कोकणी कोकणा समाज सेवा संघाने दखल घेत केला सत्कार. लंकाधिपती राजा रावणाची गेल्या 55 ते 60 वर्षापासून पूजा अर्चा करीत आले आहेत.
आदिवासी हस्त कौशल्य कलाकार शिवराम चौधरी यांची भोवाडा सोंगी मुखवटे कला पोहचली आंतरराष्ट्रीय स्तरावर
The 'Bhovada Songi' mask art of tribal artisan Shivram Chaudhary has reached the international stage.

भोवाडा सोंगी मुखवटे तयार करून आदिवासी कला संस्कृतीचे दर्शन घडवित आहेत.या आदिवासी कलाकृतीची भूरळ आजही भल्या भल्यांना पडल्या शिवाय राहात नाही. भोवाडा मध्ये लंकापती राजा रावणाची ताटी मुख्य आकर्षण असते. त्यांच्या हस्त कौशल्याची झलक आजवर सलग दोन वेळा दिल्ली येथील 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी आयोजित राजपथावर कार्यक्रमात झळकली आहे.ब्रिटनचे पंतप्रधान के. स्टार्मर यांचे मुंबईत आगमनावेळी स्वागत करण्यासाठी महाराष्ट्र सांस्कृतिक कार्य विभाग मंत्रालय मुंबई तर्फे सोंगी मुखवटे नृत्याने केले होते.त्यांच्या हस्त कौशल्याची झलक आंतरराष्ट्रीय सातासमुद्रापार ब्रिटन, जर्मनी, इटली देशात तसेच राष्ट्रीय स्तरावर दिल्ली, कोलकाता, ओडिशा, गुजरात, राजस्थान, गोवा या राज्यात पोहोचले आहेत. गोवा राज्यातील ” मोगा” म्युझियम ऑफ गोवा या ठिकाणी प्रदर्शित करण्यात आली आहेत. सापुतारा येथे बिग बी अमिताभ बच्चन यांनी सोंगी मुखवटे परिधान करून जाहिरात मध्ये शूटिंग करून खुबीने वापर केला आहे.भोवाडा कलेची गुजरात,महाराष्ट्र राज्याच्या पर्यटन विभागाने दखल घेत पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी सापुतारा येथे म्युझियम मध्ये ठेवले असून दरवर्षी आयोजित ” सापुतारा फेस्टिव्हल मध्ये पर्यटकांना भुरळ घालण्यासाठी ठेवलेले आहेत. दरवर्षी 9 ऑगस्ट आदिवासी गौरव दिनानिमित्त नाशिक, वणी, सुरगाणा, गुजरात राज्यातील कार्यक्रमात रावणाची ताटी मुख्य आकर्षण ठरत आहे. रावणाची ताटी नृत्य कलेची झलक” स्टॅच्यू ऑफ युनिटी नर्मदा सरोवर ” येथे आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहून कलेला दाद दिली आहे. रावणाची ताटी विद्यमान अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, आदिवासी कर्मयोगी आमदार जे. पी. गावित यांनी नृत्य सादर केले आहे. आदिवासी हस्तकला कौशल्याची झलक आजच्या या डिजिटल तंत्रज्ञान युगातही अनुभवायला, पहायला मिळत आहे. हिच खरी आदिवासी कला, संस्कृती, पेहराव, खाद्य संस्कृती, जल, जंगल, जमीनीचे जतन व संवर्धन करणे या विचाराने प्रेरित होऊन जगाला निसर्गाचे संवर्धन करण्याचा, विचारधारेचा संदेश दिला जातो आहे. आदिवासी कलाकार शिवराम चौधरी यांच्या कलेची कोकणा कोकणी समाजाने दखल घेत आज त्यांचा सत्कार करण्यात येत आहे.त्यांच्या या अप्रतिम कलेला मानाचा मुजरा. नुकत्याच कोलकाता येथे झालेल्या कार्यक्रमात कलाकार शिवराम चौधरी यांच्या हस्त कलेला अप्रतिम कलाकुसर म्हणून दाद मिळाली आहे. अशीच हि कलाकृती बहरत राहो याच सा-या शुभेच्छा.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250