डॉ. चित्तरंजन पुरंदरे यांचा गौरव; ‘हँड्स दॅट हील्ड, अ हार्ट दॅट लेड’ आत्मचरित्राचे प्रकाशन

आरोग्य क्षेत्रात विशेष योगदान दिलेले डॉ. चित्तरंजन पुरंदरे यांचा गौरव सोहळा आणि त्यांच्या ‘हँड्स दॅट हील्ड, अ हार्ट दॅट लेड’ या आत्मचरित्राचे प्रकाशन अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. वैद्यक क्षेत्रात पाच दशकांहून अधिक काळ निःस्वार्थ सेवा बजावताना हजारो रुग्णांचे प्राण वाचविणारे, हजारो विद्यार्थ्यांना घडविणारे आणि वैद्यकीय संशोधनाला नवी दिशा देणारे डॉ. पुरंदरे यांचे कार्य आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्यातीप्राप्त आहे.
डॉ. चित्तरंजन पुरंदरे यांचा गौरव; ‘हँड्स दॅट हील्ड, अ हार्ट दॅट लेड’ आत्मचरित्राचे प्रकाशन
Dr. Chittaranjan Purandare Honoured; Autobiography ‘Hands That Healed, A Heart That Led’ Launched

महिला आरोग्य आणि प्रसूतीशास्त्राच्या क्षेत्रात त्यांचे विशेष कार्य, संशोधन आणि अध्यापनामुळे वैद्यकीय क्षेत्राची प्रतिष्ठा उंचावल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.
कार्यक्रमास कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर व डॉ. पुरंदरे यांचे कुटुंबीय उपस्थित होते.
डॉ. पुरंदरे यांचे आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये १४० हून अधिक संशोधनपर लेख प्रसिद्ध झाले आहेत. आत्मचरित्र म्हणजे केवळ कामांची यादी नसून एका काळाचा इतिहास असतो. ज्ञान, संशोधन आणि कौशल्यांचा उपयोग समाजसेवेसाठी झाला पाहिजे, असा प्रेरणादायी संदेश देणारा डॉ. पुरंदरे यांचा जीवनप्रवास तरुणांसाठी मार्गदर्शक ठरेल – मंत्री भुजबळ

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250