प्रभाग 19 मध्ये ‘मन की बात’ कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांची उत्स्फूर्त सहभाग
माजी मंत्री तथा विद्यमान आमदार डॉ. विजयकुमार गावित, माजी खासदार डॉ. हिना गावित तसेच भाजप अनुसूचित जमाती मोर्चाचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष सुप्रिया गावित यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला.
प्रभाग 19 चे भाजप नगरसेवक हिरालाल चौधरी व शोभा चौधरी यांच्या माध्यमातून आयोजित या कार्यक्रमास भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अविनाश माळी, नगरसेवक पंकज माळी, सुषमा गावीत, ओबीसी मोर्चा उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख केतन रघुवंशी, ओबीसी मोर्चा उत्तर महाराष्ट्र सहसंपर्क प्रमुख प्रकाश गवळे, माजी जिल्हा सचिव संजय साठे, शहर सरचिटणीस प्रशांत चौधरी, परिसरातील नागरिक, भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘मन की बात’च्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील विविध विषयांवर नागरिकांशी संवाद साधतात. कार्यक्रमादरम्यान नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.

