शेतातून सोलर मोटारपंप आणि केबल वायर लंपास; अज्ञात चोरांविरुद्ध गुन्हा दाखल
(नंदुरबार) शेतातून सोलर मोटारपंपासह केबल वायर चोरीला गेल्याची घटना कोरीट येथे घडली. याप्रकरणी अनोळखीविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नंदुरबार तालुक्यातील समशेरपूर येथील विनोद लिंबा चौधरी यांचे कोरीट गावाच्या शिवारात शेत आहे. चोरट्यांनी शेतातून ८५ हजार ८०० रुपयांचे विविध साहित्य चोरून नेले. त्यात ४० हजारांचे सोलर मोटारपंप, ९ हजाराची केबल वायर, १८०० रुपयांची केबलची वायर, १० हजाराची केबलसह पाईप, १५ हजाराची केबलसह वायर, १० हजाराचे पाईप असे साहित्य लांबविले आहे. याबाबात विनोद चौधरी यांनी नंदुरबार उपनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखीविरुद्ध भा.न्या.सं.चे कलम ३०३ (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हेकॉ. पौलाद भिल करीत आहेत.
Follow Us:

