दुचाकी घसरून शिक्षकाचा मृत्यू; कोळदा गावाजवळ भीषण अपघात

नंदुरबार तालुक्यातील कोळदा गावाजवळ दुचाकी घसरून झालेल्या अपघातात शिक्षक प्रल्हाद गुलाब पाटील (४३) यांचा मृत्यू झाला. ते शहादा शहरातील रहिवासी असून समशेरपूर येथील सिसोदेर हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत होते.
दुचाकी घसरून शिक्षकाचा मृत्यू; कोळदा गावाजवळ भीषण अपघात
Teacher dies after two-wheeler skids; horrific accident near Kolda village.

नंदुरबारहून प्रकाशाकडे जात असताना कोळदा गावाजवळ त्यांची दुचाकी घसरली. रस्त्याच्या बाजूला फेकले गेल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. रुग्णालयात उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हेकाँ धनराज जाधव करीत आहेत.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250