मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानाचा आढावा; कामांना गती देण्याचे निर्देश!

नागपूर येथील हिंदूहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानाचा नियोजनबद्ध आणि सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोरेवाडा प्रकल्पाची पाहणी करून विविध कामांचा सविस्तर आढावा घेतला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानाचा आढावा; कामांना गती देण्याचे निर्देश!
devendra-fadnavis-reviews-gorewada-international-zoo-directs-to-speed-up-work

याप्रसंगी वन मंत्री गणेश नाईक, खासदार माया इनवाते, वन विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, प्रधान मुख्य वन संरक्षक(वनबल प्रमुख) एम. श्रीनिवास राव, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, पोलीस अधीक्षक ग्रामीण हर्ष पोद्दार यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
आफ्रिकन सफारी सुरू करण्यासाठी सुरू असलेल्या कामांची सद्यस्थिती, प्रकल्पाची प्रगती आणि सफारी सुरू करण्याचे अपेक्षित वेळापत्रक याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली. गोरेवाड्यात सुरू असलेल्या सर्व कामांसाठी नव्याने स्पष्ट कालमर्यादा निश्चित करून त्यानुसार कामांना गती देण्याचे निर्देश त्यांनी दिले.
ताडोबा आणि पेंच येथे येणाऱ्या पर्यटकांनी गोरेवाड्यात एक ते दोन दिवस पर्यटनासाठी घालवावेत, या दृष्टीने गोरेवाड्याचा विकास करण्याची गरज मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. ताडोबा आणि गोरेवाडा या पर्यटनस्थळांना जोडणारे प्रभावी नियोजन करून पर्यटकांचा मुक्काम वाढेल, अशा पद्धतीने सुविधा विकसित कराव्यात. प्रकल्पाच्या पुढील विकासासाठी अनुभवी आणि सक्षम सल्लागाराची नियुक्ती करावी, असे निर्देशही त्यांनी दिले.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250