महाराष्ट्राच्या शाश्वत किनारपट्टी व्यवस्थापन, पर्यावरण संवर्धन आणि पर्यावरणपूरक पर्यटनाच्या प्रयत्नांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठे यश मिळाले

आंतरराष्ट्रीय ब्ल्यू फ्लॅग ज्युरीने २०२६-२७ या हंगामासाठी महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील लाडघर व गुहागर आणि रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन या तीन समुद्रकिनाऱ्यांना प्रथमच प्रतिष्ठेचा ‘इंटरनॅशनल ब्ल्यू फ्लॅग’ पुरस्कार जाहीर केला आहे. या यशामुळे महाराष्ट्राने आंतरराष्ट्रीय ब्ल्यू फ्लॅग समुद्रकिनाऱ्यांच्या यादीत प्रथमच स्थान मिळवले आहे.
महाराष्ट्राच्या शाश्वत किनारपट्टी व्यवस्थापन, पर्यावरण संवर्धन आणि पर्यावरणपूरक पर्यटनाच्या प्रयत्नांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठे यश मिळाले
Maharashtra achieves major global recognition for sustainable coastal management and eco-tourism
          नव्याने पुरस्कारप्राप्त या तिन्ही समुद्रकिनाऱ्यांचा ब्ल्यू फ्लॅग हंगाम १५ नोव्हेंबर २०२६ पासून सुरू होणार आहे. या पुरस्काराचे प्रतीक असलेले आंतरराष्ट्रीय ब्ल्यू फ्लॅग नेदरलँड्स येथून प्रत्यक्ष प्राप्त होत असून, ते राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाकडे सुपूर्द करण्यात येणार आहेत. त्यानंतर संबंधित विभाग आणि जिल्हा प्रशासनाच्या समन्वयाने ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित करण्याचे नियोजन आहे.
            “महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी ही अभिमानास्पद कामगिरी आहे. लाडघर, गुहागर आणि श्रीवर्धन या तीन समुद्रकिनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय ‘ब्ल्यू फ्लॅग’ पुरस्कार मिळणे, ही राज्याच्या पर्यावरण संवर्धन, स्वच्छता आणि शाश्वत पर्यटनाच्या दिशेने सुरू असलेल्या प्रयत्नांना मिळालेली जागतिक पातळीवरील पावती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य शासन पर्यावरण संरक्षण आणि विकास यांचा समतोल साधण्यासाठी कटिबद्ध आहे. या पुरस्कारामुळे महाराष्ट्राच्या किनारपट्टीला जागतिक पर्यटन नकाशावर नवी ओळख मिळेल, तसेच स्थानिक रोजगार आणि अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल. भविष्यात राज्यातील अन्य पात्र समुद्रकिनाऱ्यांचाही आंतरराष्ट्रीय दर्जानुसार विकास करून महाराष्ट्राला शाश्वत आणि पर्यावरणपूरक पर्यटनाचे अग्रगण्य केंद्र बनविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू.” असे पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.
जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: