बारामतीच्या शिरपेचात मानाचा तुरा: राष्ट्रीय स्तरावर चमकलेल्या खेळाडूंचा पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून सत्कार.
राष्ट्रीय स्तरावरील कुस्ती आणि बुद्धिबळ स्पर्धांमध्ये बारामती तालुक्यातील खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवलेल्या खेळाडूंचा उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनिता अजित पवार यांच्याकडून गौरव करण्यात आला.
दिल्ली येथे पार पडलेल्या ७० व्या नॅशनल स्कूल गेम्स २०२६-२७ कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या बारामतीच्या दोन खेळाडूंनी पदकांची कमाई केली, तर राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत एका खेळाडूने देशात प्रथम क्रमांक पटकावून बारामतीचा नावलौकिक वाढविला आहे.
दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत कु. श्रावणी संजय शिंदे हिने १४ वर्षांखालील ३३ किलो वजन गटात प्रथम क्रमांक मिळवत सुवर्णयश संपादन केले. तर कु. समृद्धी प्रवीण सावंत हिने १४ वर्षांखालील ३० किलो वजन गटात तृतीय क्रमांक मिळवत कांस्यपदक पटकावले. तसेच राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत कु. अनुष्का बापू कुतवळ हिने १९ वर्षांखालील मुलींच्या गटात देशात प्रथम क्रमांक मिळवत ऐतिहासिक यश संपादन केले.
Follow Us:

