राज्यातील गुहागर, लाडघर आणि श्रीवर्धन या तीन समुद्रकिनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेचा ‘ब्लू फ्लॅग’ (Blue Flag) हा पुरस्कार जाहीर झाला

या तिन्ही समुद्रकिनाऱ्यांना अंतिम मान्यता मिळाल्याची माहिती नॅशनल ब्लू फ्लॅग ऑपरेटर डॉ. श्रीजी कुरूप यांनी दिली आहे.
राज्यातील गुहागर, लाडघर आणि श्रीवर्धन या तीन समुद्रकिनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेचा ‘ब्लू फ्लॅग’ (Blue Flag) हा  पुरस्कार जाहीर झाला
Three Maharashtra beaches—Guhagar, Ladghar, and Shrivardhan—awarded prestigious international 'Blue Flag' tag

डेन्मार्क येथील फाउंडेशन फॉर एन्व्हायर्नमेंटल एज्युकेशन (FEE) या आंतरराष्ट्रीय संस्थेमार्फत लवकरच या समुद्रकिनाऱ्यांना अधिकृत ‘ब्लू फ्लॅग’ प्रदान करण्यात येणार आहेत. पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शासन राज्यातील पर्यटनस्थळांचा जागतिक दर्जानुसार विकास करण्यासाठी प्रयत्नशील आहे. पर्यावरणपूरक पर्यटन, समुद्रकिनाऱ्यांची स्वच्छता, पर्यटकांची सुरक्षितता, पायाभूत सुविधांचा विकास आणि शाश्वत पर्यटन व्यवस्थापन या बाबींना प्राधान्य देण्यात येत आहे. या प्रयत्नांना मिळालेली ही आंतरराष्ट्रीय मान्यता महाराष्ट्राच्या पर्यटन क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: