एकतानगर येथे महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या विशेष दालनाला पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट.

यावेळी त्यांनी महाराष्ट्राच्या पारंपरिक पैठणी साड्यांची पाहणी करून पैठणी विणकामातील कलाकुसर, पारंपरिक तंत्र आणि महाराष्ट्राच्या समृद्ध वस्त्रपरंपरेची माहिती जाणून घेतली. पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली उभारलेल्या या दालनातून राज्यातील पर्यटनस्थळे, गड-किल्ले, समुद्रकिनारे, धार्मिक स्थळे, लोककला, हस्तकला आणि खाद्यसंस्कृतीचे दर्शन घडविण्यात येत आहे.
एकतानगर येथे महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या विशेष दालनाला पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट.
PM Narendra Modi visits Maharashtra Tourism's special pavilion at Ekta Nagar
            १ ते १५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत आयोजित या उपक्रमात पैठणी विणकामाचे प्रात्यक्षिक, महाराष्ट्रीय खाद्यपदार्थांचे स्टॉल, हस्तकला वस्तू आणि सांस्कृतिक कार्यक्रम ही प्रमुख आकर्षणे आहेत.
पर्यटन विभागाचे सचिव संजय यादव यांनी सांगितले की, राष्ट्रीय एकता दिनानिमित्त आयोजित या उपक्रमातून विविध राज्यांच्या सांस्कृतिक वैशिष्ट्यांची ओळख आणि विविधतेतील एकतेची भावना दृढ होत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राच्या दालनाला भेट देऊन पैठणी विणकामासह राज्याच्या कला-संस्कृतीची माहिती घेतल्याने महाराष्ट्राच्या पर्यटनवैभवाला राष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी मिळेल.
          पर्यटन संचालनालयाचे संचालक विकास पानसरे यांनी सांगितले की, महाराष्ट्राचे पर्यटनवैविध्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविण्यासाठी विभाग प्रयत्नशील आहे. केवडिया येथील उपक्रमामुळे राज्याचा ऐतिहासिक वारसा, निसर्गसौंदर्य, पारंपरिक कला आणि खाद्यसंस्कृती यांना व्यापक व्यासपीठ मिळाले असून, यामुळे महाराष्ट्रातील पर्यटनस्थळांकडे पर्यटकांचे लक्ष वेधले जाईल आणि पर्यटन क्षेत्राला चालना मिळेल.
जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: