राष्ट्रीय थ्रोबॉल स्पर्धेत मुंबई संघाची कांस्यपदकाला गवसणी

मुंबई:-पश्चिम बंगाल येथे पार पडलेल्या 34 व्या सब-ज्युनियर राष्ट्रीय थ्रोबॉल अजिंक्यपद स्पर्धेत मुंबई संघाने उत्कृष्ट कामगिरी करत तृतीय क्रमांक पटकावला असून कांस्यपदकावर आपले नाव कोरले आहे. या यशामुळे मुंबईच्या क्रीडा क्षेत्राच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला गेला आहे.
राष्ट्रीय थ्रोबॉल स्पर्धेत मुंबई संघाची कांस्यपदकाला गवसणी
mumbai-team-bags-bronze-medal-in-national-throwball-championship

या स्पर्धेत मुंबईचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कादंबरी काळे, किया खान, याना पुरोहित आणि विहान निळे या खेळाडूंनी आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत संघाच्या यशात मोलाचे योगदान दिले. विशेष म्हणजे, हे चारही खेळाडू रुस्तमजी केंब्रिज इंटरनॅशनल स्कूल, विरार येथील विद्यार्थी असून त्यांच्या या राष्ट्रीय स्तरावरील यशामुळे शाळेच्या शिरपेचातही मानाचा तुरा रोवला गेला आहे.
खेळाडूंची जिद्द, मेहनत, शिस्त, सांघिक भावना आणि उत्कृष्ट खेळाचे कौशल्य यामुळे मुंबई संघाला हे यश संपादन करता आले. तसेच प्रशिक्षक मयुरेश कमलाकर वालम यांनी खेळाडूंना दिलेले योग्य मार्गदर्शन, सातत्यपूर्ण सराव आणि खेळाडू घडविण्यासाठी घेतलेले परिश्रम या यशासाठी महत्त्वपूर्ण ठरले. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि संघ व्यवस्थापनाचे क्रीडाप्रेमी, पालकवर्ग तसेच विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे. राष्ट्रीय स्तरावर मिळवलेले हे यश निश्चितच उदयोन्मुख खेळाडूंसाठी प्रेरणादायी आहे. भविष्यात हे गुणवान खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपल्या खेळाचा ठसा उमटवतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. मुंबई संघातील सर्व खेळाडू, प्रशिक्षक मयुरेश वालम आणि रुस्तमजी केंब्रिज इंटरनॅशनल स्कूल, विरार यांचे या दैदिप्यमान यशाबद्दल हार्दिक अभिनंदन

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: