पोषण सप्ताहा च्या निमित्ताने “पोषण अभियान” विषयावर मल्टीमीडिया चित्रप्रदर्शनीचे आयोजन

(नंदुरबार) भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालया अंतर्गत येणा-या केन्द्रीय संचार ब्यूरोतर्फे पोषण सप्ताहाच्या निमित्ताने 'पोषण अभियान' या विषयावर जिल्हा प्रशासन, नंदुरबार, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, शहादा व म्हसावद आणि कृषी उत्पन्न बाजार समिती, शहादा यांच्या सहयोगाने 3 दिवसीय मल्टी मिडिया चित्रप्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे.
पोषण सप्ताहा च्या निमित्ताने “पोषण अभियान” विषयावर मल्टीमीडिया चित्रप्रदर्शनीचे आयोजन
Multimedia exhibition organized on the theme of "Poshan Abhiyan" to mark Nutrition Week.

भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालया अंतर्गत येणा-या केन्द्रीय संचार ब्यूरो तर्फे जिल्हा प्रशासन, नंदुरबार, एकात्मिक बाल विकास सेवा योजना शहादा व म्हसावद, आणि कृषी उत्पन्न बाजार समिती, शहादा यांच्या सहयोगाने शहादा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या डोम मध्ये 3 दिवसीय मल्टीमिडिया चित्रप्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे. हि चित्रप्रदर्शनी दिनांक 1 ते 3 सप्टेंबर 2026 मंगळवार ते गुरूवार या कालावधीत सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत सर्व नागरिकांसाठी मोफत खुली राहील. लोकांना पोषणा संबंधी माहिती व्हावी या उद्देशाने ह्या जनजागृतीपर चित्रप्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे. या चित्रप्रदर्शनीचे उ‌द्घाटन दिनांक 1 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 11 वाजता शहाद्याचे आमदार राजेश पाडवी व नगराध्यक्ष, अभिजित पाटील यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी चित्रप्रदर्शनीच्या बरोबरच या ठिकाणी पोषण व आरोग्य, स्टॉल, स्पर्धा, गीत व नाटक कार्यक्रम (पथनाट्य), मार्गदर्शन आणि बक्षिस वितरण इत्यादि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. तरी या चित्रप्रदर्शनीला मोठ्या संख्येने भेट देऊन पोषणा संबंधी माहिती जाणुन घ्यावी असे आवाहन केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रलायाच्या केन्द्रीय संचार ब्यूरो तर्फे करण्यात आले आहे.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250