नंदनगरीत बाप्पाच्या आगमनाची चाहूल! ‘दादा-बाबा’ गणपतीचे उत्साहात पाटपूजन; संकष्टीला मंदिरांमध्ये भाविकांची मांदियाळी

नंदुरबार जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राला आता वेध लागले आहेत ते लाडक्या गणरायाच्या आगमनाचे! नंदनगरीत या गणेशोत्सवाचा श्रीगणेशा अत्यंत भक्तीमय वातावरणात झाला आहे. नंदुरबार शहरातील मानाचे व नवसाचे श्रद्धास्थान असलेल्या श्री दादा आणि श्री बाबा गणपतीच्या मूर्ती निर्मितीसाठी संकष्ट चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर पारंपरिक पद्धतीने विधिवत 'पाटपूजन' सोहळा संपन्न झाला. श्रावण सोमवार आणि संकष्टी चतुर्थी असा दुग्धशर्करा योग आल्यामुळे शहरातील सर्वच गणेश मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांची दिवसभर मोठी गर्दी पाहायला मिळाली.
नंदनगरीत बाप्पाच्या आगमनाची चाहूल! ‘दादा-बाबा’ गणपतीचे उत्साहात पाटपूजन; संकष्टीला मंदिरांमध्ये भाविकांची मांदियाळी
Signs of Bappa's arrival in Nandanagari! Enthusiastic Pat-pujan (ritual worship of the deity's pedestal) for the 'Dada-Baba' Ganpati; throngs of devotees visit temples on Sankashti.

१५ नवविवाहित जोडप्यांच्या हस्ते ‘दादा गणपती’चे पूजननंदुरबार जिल्हा गणेशोत्सव समिती गठीत झाल्यानंतर शहरात उत्सवाच्या तयारीला वेग आला आहे. संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने सकाळी ठीक ११ वाजता मूर्ती निर्मितीच्या पूजेला सुरुवात झाली. यावेळी समाजातील १५ नवविवाहित जोडप्यांच्या हस्ते श्रीमंत दादा गणपतीचे विधीवत पाटपूजन करण्यात आले. या सोहळ्याला परिसरातील शेकडो भाविक उपस्थित होते. तसेच नवसाचे श्री नवश्या गणपती, श्री तरश्या गणपती, भाऊ गणपती आणि माना गणपती यांचेही पूजन करून मूर्ती निर्मितीच्या कामाला अधिकृतपणे सुरुवात करण्यात आली.’बाबा गणपती’च्या पूजनाने परिसर भक्तीमयदुसरीकडे, मानाचा आणि नवसाचा समजल्या जाणाऱ्या ‘श्रीमंत बाबा गणपती’ गणेशोत्सव मंडळाच्या वतीनेही संकष्ट चतुर्थीचे औचित्य साधून भव्य पाटपूजन सोहळा आयोजित करण्यात आला होता. माजी जि.प. उपाध्यक्ष ॲड. राम चंद्रकांत रघुवंशी व सौ. ऋतुजा रघुवंशी यांच्यासह १५ नवविवाहित जोडप्यांच्या हस्ते श्रीमंत बाबा गणपतीचे विधीवत पूजन करण्यात आले. या धार्मिक विधीनंतर ढोल-ताशांच्या गजरात आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.शहरातील मंदिरांमध्ये भाविकांची गर्दीरात्री ठीक ८ वाजता नवसाच्या श्री दादा गणपतीचा पाटपूजन सोहळा भाविकांच्या उपस्थितीत पार पडला, त्यानंतर दर्शनासाठी भाविकांनी मोठी रांग लावली होती. या ऐतिहासिक आणि धार्मिक परंपरेचा सोहळा यशस्वी करण्यासाठी मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला मंडळ आणि सर्व सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. या योगानिमित्त नंदुरबार शहरातील श्री गणपती मंदिर, कल्पेश्वर गणपती मंदिर, दळवे गल्लीतील गणपती मंदिर यांसह विविध भागांतील मंदिरांमध्ये विठ्ठल-रुक्मिणी आणि भगवान शंकराच्या पूजेसाठीही भाविकांची दिवसभर लगबग दिसून आली.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250