राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची बंगाल क्लबच्या दुर्गापूजा उत्सवाला भेट
मुंबई: राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी शिवाजी पार्क येथे आयोजित बंगाल क्लबच्या दुर्गापूजा उत्सवाला भेट दिली.
यावेळी त्यांनी देवी दुर्गेची पूजा करून दर्शन घेतले. यावेळी राज्यपालांच्या हस्ते बंगाल क्लबच्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.
राज्यपाल जिष्णु देव वर्मा म्हणाले, बंगाल क्लबच्यावतीने आयोजित दुर्गापूजा हा सर्वांना एकत्र आणणारा, सामाजिक एकोपा आणि सांस्कृतिक परंपरा जपणारा उत्सव आहे. समाजाची खरी ताकद ही आर्थिक संपत्तीपेक्षा संस्कृती आणि एकजुटीत आहे. समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन काम करावे आणि परस्परांमध्ये एकोपा कायम राहावा, अशी आपण सर्वांनी मिळून देवीकडे प्रार्थना करूया, असेही ते यावेळी म्हणाले.
यावेळी बंगाल क्लबचे पदाधिकारी, सदस्य आणि भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Follow Us:

