आंगलेतील आई चंडिकेच्या मंदिरात नवरात्रौत्सवा निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
राजापूर:-तालुक्यातील श्री.देव चंडिका श्री ब्राह्मण देव श्री देव रामेश्वर ट्रस्ट आंगलेच्या वतीने आई चंडिकेच्या मंदिरात परंपरेने साजरा होणारा घटस्थापना नवरात्रोत्सव रविवार 11 आक्टोबर 2026 ते मंगळवार 20 आक्टोबर 2026 या दहा दिवस साजरा होत आहे.
या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याच दरम्यान 17 आक्टोबर शनिवार रोजी रात्री 10 वाजता संगमेश्वर तालुक्यातील कलगीवाले युवा शाहिर कैलास देवाळे व आंगले गावचे नवोदित तुरेवाले युवा शाहिर कु.श्रीनाथ राऊत यांचा आपल्या गावात प्रथमच जंगी सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रम योगेश गणेश नारकर व मुंबईकर मंडळ व ग्रामस्थ मंडळ यांच्या सौजन्याने आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला परिसरातील रसिक प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कोकणातील पारंपरिक लोककलेचा आस्वाद घ्यावा असे आवाहन
Follow Us:

