नंदुरबारहून झाशीच्या दिशेने शेतकऱ्यांची एक्सपोजर व्हिजिट, शाश्वत शेती, मृदा संवर्धन आणि निकृष्ट जमिनीच्या पुनर्स्थापनेचा प्रत्यक्ष अनुभव घेणार

नंदुरबार(प्रतिनिधी):-भूमी निकृष्टता तटस्थता (Land Degradation Neutrality–LDN) प्रकल्पांतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील 10 शेतकऱ्यांचा गट उत्तर प्रदेशातील झाशी येथे एक्सपोजर व्हिजिटसाठी रवाना झाला आहे.
नंदुरबारहून झाशीच्या दिशेने शेतकऱ्यांची एक्सपोजर व्हिजिट, शाश्वत शेती, मृदा संवर्धन आणि निकृष्ट जमिनीच्या पुनर्स्थापनेचा प्रत्यक्ष अनुभव घेणार
Farmers' Exposure Visit to Jhansi from Nandurbar

या अभ्यास दौऱ्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शाश्वत भू- व्यवस्थापन आणि आधुनिक कृषी पद्धतींचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे. जमिनीची उत्पादकता टिकवून ठेवणे, मृदा धूप रोखणे, पाण्याचे संवर्धन करणे आणि निकृष्ट झालेल्या जमिनींचे पुनर्स्थापन करणे ही आजच्या शेतीसमोरील महत्त्वाची आव्हाने आहेत. या पार्श्वभूमीवर झाशी येथील विविध उपक्रमांची प्रत्यक्ष पाहणी नंदुरबारच्या शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे. या एक्सपोजर व्हिजिटदरम्यान शेतकऱ्यांना शाश्वत शेती, मृदा व जलसंधारण, निकृष्ट जमिनीचे पुनर्स्थापन, कृषी-वनीकरण, वन व गवताळ भू-दृश्यांचे पुनर्स्थापन यांसह विविध विषयांवरील प्रत्यक्ष कामांची माहिती मिळणार आहे. त्याचबरोबर स्थानिक परिस्थितीनुसार शाश्वत आणि हरित उपजीविकेच्या संधींबाबतही शेतकरी मार्गदर्शन घेणार आहेत.
प्रत्यक्ष अनुभवातून स्थानिक शेतीला दिशा, केवळ प्रशिक्षण किंवा सैद्धांतिक माहितीपुरता हा दौरा मर्यादित नसून, यशस्वी पद्धती प्रत्यक्ष शेतात पाहून त्यामागील नियोजन, अंमलबजावणी आणि त्याचे परिणाम समजून घेण्यावर या भेटीचा भर राहणार आहे. त्यामुळे झाशी येथील अनुभव नंदुरबार जिल्ह्यातील स्थानिक भौगोलिक व हवामान परिस्थितीनुसार शेतकऱ्यांना उपयोगात आणता येऊ शकतील, अशी अपेक्षा आहे.
विशेषतः सातपुडा परिसरातील अनेक भागांमध्ये पाण्याची उपलब्धता, मातीची गुणवत्ता, पावसाचे बदलते स्वरूप आणि शेतीची उत्पादकता यांसारखी आव्हाने आहेत. अशा परिस्थितीत मृदा व जलसंधारणा सोबतच कृषी- वनीकरण आणि विविध शाश्वत उपजीविका उपक्रमांचा अवलंब करण्यासाठी या अभ्यासदौऱ्यातून नवीन दिशा मिळू शकते. यशस्वी प्रयोग नंदुरबारमध्ये राबविण्याचा प्रयत्न, नंदुरबार LDN Landscape Project अंतर्गत आयोजित या एक्सपोजर व्हिजिटचा प्रमुख उद्देश शेतकऱ्यांना शाश्वत भू- व्यवस्थापनाच्या यशस्वी पद्धतींची प्रत्यक्ष ओळख करून देणे आणि त्यांचा स्थानिक पातळीवर अवलंब करण्यास प्रोत्साहन देणे हा आहे. झाशी येथील विविध प्रयोग, तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन पद्धतींचा अभ्यास करून परतल्यानंतर त्यातील उपयुक्त बाबी नंदुरबारच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे तसेच स्थानिक पातळीवर त्याची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न होण्याची अपेक्षा आहे. जमिनीचे आरोग्य, पाण्याचे संवर्धन आणि शेतीची उत्पादकता यांचा समतोल साधत जमीन वाचवा, पाणी वाचवा आणि शाश्वत शेतीकडे वाटचाल करा’ हा संदेश या अभ्यासदौऱ्यातून पुढे येत आहे.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: