शिक्षकांची वेतनाची प्रतीक्षा संपली; आता जॉईन होताच पहिल्या महिन्यापासून नियमित पगार सुरू होणार
(नंदुरबार)खासगी अनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांमध्ये नव्याने रुजू होणाऱ्या शिक्षकांची माहिती ऑनलाइन प्रणालीत भरताच अवघ्या अर्ध्या तासात (३० मिनिटांत) 'शालार्थ आयडी' तयार होणार असून, रुजू झाल्यापासूनच त्यांचा नियमित पगार सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
- अर्ध्या तासात शालार्थ आयडी: पवित्र पोर्टलद्वारे निवड झालेल्या शिक्षकांची कागदपत्रे आधीच पडताळलेली असतात. त्यामुळे शाळेत रुजू झाल्यानंतर मुख्याध्यापक किंवा संस्थाचालकांनी माहिती भरताच ३० मिनिटांत शालार्थ आयडी तयार होईल आणि शिक्षकाचे नाव तात्काळ वेतन प्रणालीत (पे-रोल) समाविष्ट होईल.
- वेतनाची प्रतीक्षा संपणार: यापूर्वी शालार्थ आयडीसाठी शिक्षणाधिकारी आणि शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवून मंजुरीची वाट पाहावी लागत असे. यामुळे नवीन शिक्षकांना सहा महिने ते वर्षभर विनावेतन काम करावे लागत होते, पण आता कार्यालयातील हेलपाटे वाचणार आहेत.
- कोणती माहिती आवश्यक?: ऑनलाइन आयडी तयार करण्यासाठी शिक्षकाचे नियुक्तीपत्र, रुजू अहवाल, आधार कार्ड, पॅन कार्ड, राष्ट्रीयीकृत बँकेचे पासबुक आणि वारसदाराची माहिती प्रणालीवर नोंदवावी लागणार आहे.
- मुलाखतीचे व्हिडिओ रेकॉर्डिंग बंधनकारक: खासगी संस्थांमधील शिक्षक भरती प्रक्रिया पारदर्शक राहावी आणि गैरव्यवहार टळावा यासाठी उमेदवारांच्या मुलाखतीचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करणे अनिवार्य करण्यात आले आहे.
Follow Us:

