नंदुरबार विधानसभा मतदारसंघ: एक नवे मतदान केंद्र वाढले, तर ‘या’ केंद्राचे झाले विलीनीकरण!

नंदुरबार :आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार विधानसभा मतदारसंघात मतदारांच्या सोयीसाठी आणि प्रशासकीय सुलभतेसाठी महत्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. मतदारसंघातील एका केंद्राचे विभाजन करून नवीन केंद्र तयार करण्यात आले आहे, तर कमी मतदार संख्या असलेल्या एका केंद्राचे दुसऱ्या केंद्रात विलीनीकरण करण्यात आले आहे. या नव्या बदलांमुळे आता नंदुरबार विधानसभा मतदारसंघात एकूण ३६७ मतदान केंद्र असणार आहेत, अशी अधिकृत माहिती नंदुरबारचे तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांच्याकडून देण्यात आली आहे.
नंदुरबार विधानसभा मतदारसंघ: एक नवे मतदान केंद्र वाढले, तर ‘या’ केंद्राचे झाले विलीनीकरण!
Nandurbar Assembly Constituency: One new polling station added, while 'this' station has been merged!

नंदुरबार येथील तहसील कार्यालयात तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली राजकीय पक्षांची एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत नवीन मतदान केंद्र आणि विलीनीकरणाच्या प्रक्रियेसह विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.काय आहेत नेमके बदल?नवीन मतदान केंद्राची निर्मिती: नंदुरबार विधानसभा मतदारसंघातील केंद्र क्रमांक ४७-टेंभे त.श. या मतदान केंद्रात मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढल्याने या केंद्राचे विभाजन करण्यात आले आहे. त्यानुसार आता ‘४८-टेंभे त.श.’ हे नवीन मतदान केंद्र अस्तित्वात आले आहे.मतदान केंद्राचे विलीनीकरण: नंदुरबार शहरातील मतदान केंद्र क्रमांक ३०१ मध्ये मतदारांची संख्या ३०० पेक्षा कमी होती. त्यामुळे मतदारांची अपुरी संख्या लक्षात घेता, हे केंद्र क्रमांक ३०० मध्ये विलीनीकरण (मर्ज) करण्यात आले आहे.नवीन मतदारांसाठी सुवर्णसंधी; ‘या’ तारखा लक्षात ठेवा!बैठकीत मतदार यादी संदर्भातील महत्त्वपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे:पात्रता: ज्या मतदारांची जन्म तारीख १ ऑक्टोबर २००८ पर्यंत आहे, त्यांना फॉर्म नंबर ६ भरून आपले नाव मतदार यादीत समाविष्ट करता येईल.दावे व हरकती: मतदार यादीवरील दावे व हरकती नोंदवण्यासाठी नंदुरबार तहसील कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. यासाठी ३ सप्टेंबर २०२६ पर्यंत मुदत देण्यात आली आहे.निवाडा कालावधी: दाखल झालेल्या दावे व हरकती निकाली काढण्याचा कालावधी २१ ऑक्टोबर २०२६ असा निश्चित करण्यात आला आहे.अंतिम मतदार यादी: सर्व सुधारणांनंतर ४ नोव्हेंबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.प्रशासनाने सर्व पात्र नागरिकांना आणि नवमतदारांना वेळेत आपली नावे नोंदवून घेण्याचे आवाहन केले आहे.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250