महिला लोकशाही दिनाचे १९ ऑक्टोबर रोजी आयोजन; महिलांना तक्रारी मांडण्याची संधी

(नंदुरबार) महिलांच्या समस्या व तक्रारींचे निराकरण करण्यासाठी तसेच त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यात सोमवार, दि. १९ ऑक्टोबर २०२६ रोजी महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.
महिला लोकशाही दिनाचे १९ ऑक्टोबर रोजी आयोजन; महिलांना तक्रारी मांडण्याची संधी
mahila-lokshahi-din-19-october
         महिलांनी आपल्या तक्रारींचे निराकरण करून घेण्यासाठी दि. १९ ऑक्टोबर रोजी दुपारी १ ते २ वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयातील रंगावली सभागृहात स्वतः उपस्थित राहून किंवा ऑनलाइन माध्यमातून आपल्या तक्रारी मांडाव्यात.
          महिलांच्या तक्रारी वैयक्तिक स्वरूपाच्या असाव्यात. न्यायप्रविष्ट प्रकरणे, आस्थापनाविषयक तसेच सामूहिक तक्रारी स्वीकारल्या जाणार नाहीत, याची संबंधित महिलांनी नोंद घ्यावी.
महिलांना त्यांच्या समस्या मांडण्यासाठी सुलभ व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.
जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: