शिक्षणासोबत विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्यही महत्त्वाचे; आदिती तटकरे
वर्ल्ड मेमन ऑर्गनायझेशन (डब्ल्यूएमओ) इंडिया आणि यामा पटेल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सामाजिक उपक्रमांतर्गत अंजुमन-ए-इस्लाम संचलित सैफ तय्यबजी गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज येथे गरजू पालकांना रेशन किटचे वाटप महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले.
बदलत्या काळातील वाढती स्पर्धा लक्षात घेता विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसोबतच त्यांच्या मानसिक आरोग्याचे संगोपन, गुणवत्तेबरोबरच विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य बळकट करणे आवश्यक आहे. तसेच शिक्षण व मूलभूत सुविधांसाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करावे, असे आवाहन मंत्री आदिती तटकरे यांनी यावेळी सांगितले.

