
मुंबई: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ आणि ‘दिलखुलास’ या कार्यक्रमांत “हिंद-दी-चादर” श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नवी मुंबई येथे आयोजित कार्यक्रमाची तयारी व रूपरेषा या विषयाच्या अनुषंगाने हिंद-दी-चादर श्री गुरू तेग बहादुर साहिबजी 350 व्या शहीदी समागम समितीचे समन्वयक रामेश्वर नाईक यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे.
‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमांतर्गत ही मुलाखत मंगळवार, 24 फेब्रुवारी 2026 रोजी रोजी रात्री 8.00 वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर पाहता येणार आहे. तर ‘दिलखुलास’ कार्यक्रमातील ही मुलाखत बुधवार, 25 आणि गुरूवार, 26 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर ऐकता येणार असून ही मुलाखत ‘News On AIR’ या मोबाईल ॲपवरही उपलब्ध राहणार आहे. या मुलाखतीचे सूत्रसंचालन निवेदिका शिबानी जोशी यांनी केले आहे. तसेच महासंचालनालयाच्या अधिकृत या समाजमाध्यमांवर देखील उपलब्ध होईल.
X (Twitter) : https://twitter.com/MahaDGIPR
Facebook : https://www.facebook.com/MahaDGIPR
YouTube : https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागमाचा भव्य कार्यक्रम 28 फेब्रुवारी व 1 मार्च 2026 रोजी नवी मुंबईतील खारघर येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. 2025-26 हे श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांचे 350 वे शहीदी समागम शताब्दी वर्ष असून, या ऐतिहासिक पर्वाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासन व गुरु नानक नाम सेवा संगत (सिख, सिकलकार, बंजारा, लबाना, सिंधी व मोहियाल) तसेच इतर सर्व समाजांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. या दोन दिवसीय कार्यक्रमासाठी अंदाजे 10 लाख भाविक नवी मुंबई मध्ये दाखल होण्याची शक्यता असून, त्या अनुषंगाने सर्व प्रशासकीय यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.
देशभरातून लाखो भाविक या कार्यक्रमात सहभागी होणार असल्याने या पार्श्वभूमीवर भाविकांसाठी सुरक्षा, पाणीपुरवठा, भोजन, निवास, वाहतूक, स्वच्छता आदी व्यवस्था तसेच हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी संबंधित सर्व यंत्रणांशी कशा प्रकारे समन्वय साधण्यात येत आहे. याबाबत ‘जय महाराष्ट्र’ आणि ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून समितीचे समन्वयक रामेश्वर नाईक यांनी सविस्तर माहिती दिली आहे.















